अंबाजोगाईच्या कृषी विद्यालयाच्या मुला मुलींच्या वस्तीगृहासाठी तसेच इतर बांधकामासाठी तब्बल 35 कोटी रुपयांचा निधी कृषी खात्या कडून झाला मंजूर

सब टायटल: 
माजी आमदार संजय भाऊ दौंड यांनी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचे मानले आभार
Maharashtra

.

                अंबाजोगाई (प्रतिनिधी)-

       मराठवाड्यात सर्वात प्रथम स्थापन झालेले अंबाजोगाई येथील परभणी कृषी विद्यापीठ अंतर्गत अंबाजोगाईचे कृषी विद्यालय शेवटच्या घटका मोजत आहे वस्तीगृहाच्या इमारतीला आली अवकळा कर्मचाऱ्यांना निवासस्थान नाही, मुलींना शहरात भाड्याने खोली करून राहावे लागते अशा आशयाची बातमी मराठवाडा दर्पण ने दाखवल्यानंतर त्यावेळचे विधान परिषद सदस्य आमदार संजय भाऊ दौंड यांनी बातमीची तातडीने दखल घेत राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना दिनांक 17 जुलै 2023 रोजी लेखी निवेदन देऊन मुला मुलींच्या वस्तीगृहासाठी तसेच इतर बांधकामासाठी निधीची मागणी केली संजय भाऊ दौंड यांच्या अथक प्रयत्नानंतर राज्य शासनाने बांधकामासाठी तब्बल 35 कोटी रुपये निधीला मंजुरी दिल्याबद्दल दौंड यांनी राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचे आभार मानले आहेत

           संजय भाऊ दौंड यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना दिलेल्या  निवेदनात म्हटले होते आंबेजोगाई येथे 1960 साली स्थापन झालेले कृषी तंत्र विद्यालय जिल्हा परिषद बीड यांच्याकडून दिनांक 1 /4/ 1974 रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाकडे हस्तांतर झाले आहे 1968 साली विद्यार्थ्यांसाठी निवासी वस्तीगृहाचे बांधकाम झाले आहे सदर विद्यालयाची विद्यार्थी क्षमता प्रथम वर्ष साठ व द्वितीय वर्ष 60 अशी एकूण 120 आहे परंतु विद्यार्थ्यांना राहण्यासाठी असलेले 55 वर्षांपूर्वीचे वस्तीग्रह पूर्णपणे मोडकळीस आलेले आहे 2016 साल पासून वस्तीगृहात प्रवेश देण्यात येत नाही त्यामुळे गेली आठ वर्षापासून कृषी विद्यालयात शिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या मुला-मुलींना राहण्याची प्रचंड गैरसोय होत आहे

          साठ मुली करिता व 60 मुलाकरिता असे दोन नवीन निवासी वस्तीगृहाचे बांधकाम होणे अत्यंत गरजेचे आहे तसेच बीड जिल्ह्यातील सहा खाजगी कृषी विद्यालयातील 360 व शासकीय कृषी विद्यालयातील 60 असे एकूण 420 विद्यार्थ्यांच्या बौद्धिक परीक्षा आंबेजोगाई येथे घेतल्या जातात या परीक्षा काळात विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी बसण्याकरिता चार परीक्षा हॉलचे बांधकाम करणे आवश्यक आहे त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी संजय भाऊ दौंड यांच्या निवेदनावर तात्काळ प्रधान सचिवांना प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले

             अखेर 15 मार्च 2024 रोजी कृषी खात्याच्या मार्फत अधिकृतपणे माजी आमदार संजय भाऊ दौंड यांनी सुचवलेल्या कामांना 35 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला मुलांच्या निवासी वस्तीगृहासाठी 14 कोटी 87 लाख 45 हजार रु तसेच मुलींच्या निवासी वस्तीगृहासाठी 14 कोटी 87 लाख 45 हजार रु असा समान निधी मंजूर झाला आहे त्यानंतर तिसरी मागणी कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचे बांधकाम करण्यासाठी पाच कोटी 48 लाख 3 हजार रु एवढ्या निधीला मान्यता देण्यात आली आहे माजी आमदार संजय भाऊ दौंड यांनी कृषी खात्याकडून कृषी विद्यालय व कृषी महाविद्यालयासाठी तब्बल 35 कोटी रुपयाचा निधी आणल्याबद्दल माजी आमदार संजय भाऊ दौंड यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे