बीड लोकसभेची उमेदवारी पंकजाताई मुंडे यांना जाहीर झाली मात्र--

सब टायटल: 
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट उमेदवारी कोणाला देते यावर बरेच अवलंबून
Rajkiya

.

             अंबाजोगाई (प्रतिनिधी)-

          लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागू शकते भाजपाच्या दुसऱ्या यादीत बीड लोकसभेची उमेदवारी विद्यमान खासदार डॉ प्रीतम ताई मुंडे यांना नाकारत भाजपने गेली पाच वर्षापासून उमेदवारी निवडणूक कोणतीही असो सतत चर्चेत राहणाऱ्या पंकजाताई मुंडे यांना जाहीर केली मात्र आता कमी वेळात मतदारापर्यंत पंकजाताई मुंडे कसे पोहोचणार हा प्रश्न आहेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटातर्फे बीड लोकसभेची उमेदवारी कोणाला मिळते यावर बीड लोकसभा निवडणुकीच्या निवडणुकीत विजय कोणाचा होईल अंदाज बांधता येईल पवार कोणती खेळी करतात याकडे बीड जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे

                      बीड लोकसभा मतदारसंघाची लांबी रुंदी भरपूर असल्याने कोणताही उमेदवार मतदारापर्यंत निवडणूक लागेपर्यंत पोहोचू शकत नाही स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे सुद्धा रात्रंदिवस मतदार संघात फिरायचे तेही शेवटपर्यंत मतदारापर्यंत पोहोचू शकले नव्हते पंकजाताई मुंडे यांचे गेली पाच वर्ष पक्षांतर्गत गटबाजीमुळे संघर्षात गेले प्रत्येक निवडणुकीच्या वेळी त्यांच्या नावाची चर्चा व्हायची शेवटच्या टप्प्यात त्यांच्या समर्थकांना संधी मिळायची मात्र मुंडेंना डावलले जायचे बीड लोकसभेच्या उमेदवारीवरून विद्यमान खासदार डॉ प्रीतम ताई मुंडे यांना उमेदवारी नाकारून पंकजाताई मुंडे यांना उमेदवारी नक्की मिळणार असा विश्वास सर्वसामान्य जनतेला वाटत होता तेच झाले यामुळे पंकजाताई मुंडे यांना उमेदवारी मिळाल्याचा जल्लोष साजरा करता आला नाही कारण विद्यमान खासदारांचे भाजपाने तिकीट कापले आहे

              पंकजाताई मुंडे असो अथवा डॉ प्रीतम ताई मुंडे यांच्यावर जिल्ह्यातील जनता मुंडे यांच्या लेकी म्हणून प्रेम करतात मात्र अनेक प्रमुख कार्यकर्त्यांना वाटायचे पंकजाताई पक्षातील नेते आपल्याला  सतत डावलतात त्यांना आपली ताकद काय दाखवू तुम्ही फक्त सर्वसामान्य जनतेशी नाळ जुळवून ठेवा कार्यकर्त्यांच्या या मागणीकडे पंकजाताई मुंडे यांनी गांभीर्याने विचार केला असता तर आज चित्र वेगळे दिसले असते अशी चर्चा होत आहे गेली पाच वर्षात जिल्ह्यातील विविध तालुक्यात जनसंपर्क ठेवला असता तर आजची निवडणूक सोपी केली असती आज पंकजाताई मुंडे यांना बीड लोकसभेची निवडणूक विरुद्ध उमेदवार कोणीही असो म्हणावी तेवढी सोपी राहणार नाही जेव्हा सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून प्रमुख भूमिकेत असणारे नेते कार्यकर्ते सांगत होते ताई तुम्ही संघर्ष करा रस्त्यावर उतरा त्यावेळी पंकजाताई मुंडे यांना हे सांगणाऱ्या कार्यकर्त्याचा राग येत होता अनेक ठिकाणी प्रमुख कार्यकर्त्यांचा ताईनी केलेला अपमान सतत गप्प राहण्याच्या भूमिकेमुळे कट्टर समर्थक कार्यकर्त्यांनी वाट पाहून मार्ग बदलला मात्र पंकजाताई मुंडे यांनी भूमिकेत बदल केला नाही या सर्व बाबींचा परिणाम पंकजाताई मुंडेंना येत्या लोकसभा निवडणुकीत फटका बसू शकतो एवढे मात्र नक्की

               आज भाजपाने बीड लोकसभेची उमेदवारी जाहीर केली त्यामुळे आता तरी पंकजाताई मुंडे यांनी स्वतःमध्ये बदल करून घेणे महत्त्वाचे आहे सर्वात पहिल्यांदा सोबत तेच ते समर्थक कडे करून असतात नवीन माणसांना ते भेटू देत नाहीत त्यांना व्यथा मनातील बोलायचे असते तुम्ही कार्यकर्त्यांच्या गराड्यात असतात निवडणूक होईपर्यंत गराडा बाजूला करा सोबत अठरापगड जाती धर्माचे लोक सोबत आहेत असे चित्र निर्माण करा एकदा लोकांना संदेश जाऊ द्या गोपीनाथ मुंडे भाजपाच्या तिकिटावर  लढत असले तरी ते अल्पसंख्याक समाजात आपली विश्वासार्हता निर्माण केली होती तुम्हालाही तेवढीच अल्पसंख्याक समाजामध्ये मान्यता आहे तुम्ही त्या लोकांना किमान भेटा दुसरे सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला पक्षांतर्गत जे नेते विरोध करतात त्यांचे समर्थक स्थानिक पातळीवर तुमचे समर्थक म्हणून मिरवतात एकदा सोक्षमोक्ष करा नेमका कोण तुमचा कोण विरोधी त्याशिवाय चित्र स्पष्ट होणार नाही

              आता राहता राहिला विरोधी गटाचा उमेदवार कोण जी अवस्था स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या निवडणुकीच्या वेळी झाली तेच तुमच्या बाबतीतही होते तुमच्या विरोधात निवडणूक लढवली की त्या उमेदवाराची राजकीय उंची वाढते आमदार सुरेश धस, रमेश आडसकर ,बजरंग सोनवणे सह अनेकांना लोकसभा निवडणुकीनंतर राजकीय उंची वाढल्यामुळे सोनवणे वगळता दोन्ही नेते सध्या भाजपमध्ये आहेत भाजप ,शिवसेना शिंदे गट ,राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट असे तीन पक्षाची राज्यामध्ये आघाडी असली तरी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे तुमच्या सोबत आहेत तेच प्रचार प्रमुख राहतील असा अंदाज बांधला जात आहे तुम्ही फक्त समर्थकांच्या गराड्यातून बाहेर निघा सर्वसामान्य जनतेला आशीर्वाद मागा नक्की सर्वसामान्य जनता तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही एवढे मात्र खरे !