बोलताना विश्वस्त म्हणायचे कृती करताना मात्र मालकासारखे निर्णय घ्यायचे

.
अंबाजोगाई शहरात सहकार खात्याच्या माध्यमातून अनेक संस्था अस्तित्वात आल्या त्या संस्थेचा फायदा सर्वसामान्य जनता सोडा जे कार्यकर्ते रात्रंदिवस नेत्यासाठी राबत असतात त्यांना तरी त्याचा फायदा झाला का विचारले तर कार्यकर्ता अर्धा तास आपली आपबीती सांगतो बोलताना संस्थेचे विश्वस्त म्हणून आम्ही काम करतो म्हणणारे प्रत्यक्षात निर्णय घेताना मालकासारखे निर्णय घेतात हे सर्वांना ठाऊक झाले आहे तरीही दुहेरी भूमिका बंद कधी होणार ? अंबाजोगाई नगर परिषदेत काल तर नवीनच भानगड उघडकीस आली इतर वेळा जन्म मृत्यू प्रमाणपत्रासाठी कायद्याचा किस पडणारे पदाचे कर्मचारी चिरीमिरी घेऊन प्रमाणपत्र देत असल्याचा प्रकार उघडकीस आला केटली पेक्षा चहा जास्त गरम असल्याने असे प्रकार सर्रास सुरू असल्याची चर्चा होत आहे
अंबाजोगाई शहरात कार्यरत कोणतीही संस्था घ्या त्या संस्थेचे विश्वस्त पदावर कोण आहेत इतरांना का जमत नाही तेच ते नावे समोर येतात या संस्थेच्या माध्यमातून विश्वस्तांचा कसा विकासाचा आलेख सतत वाढत गेला हा लपून राहिलेला नाही संस्थेच्या एकाच्या दोन दोनच्या दहा शाखा झाल्या अंबाजोगाईकर म्हणून प्रत्येकाला अभिमानाच आहे अंबाजोगाई शहर सोडून शाखेच्या उद्घाटनाला माध्यमाच्या प्रतीनिधी पासून कार्यकर्त्यांना भाड्याने गाड्या करून घेऊन जायचे शोभा वाढवायची मात्र अंबाजोगाई शहरात कार्यक्रम असला तर त्यासाठी स्वतःला विश्वस्त म्हणून घेणारे थेट मालकासारखे वागू लागतात तुमच्या संस्थेच्या रोपट्यापासून वटवृक्ष करण्यात अंबाजोगाईतील प्रत्येकाचा काही ना काही खारीचा वाटा होता आहे भविष्याचे कोण सांगणार कमीपणा का वाटतो ? अंबाजोगाईकरांनी तुम्हाला राजकीय मान्यता दिली म्हणून राजकीय वारस थोपवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी अंबाजोगाईची जनता वारसदाराला स्वीकारलेच असे अंबाजोगाईकराच्या स्वभावात नाही हा इतिहास आहे बोलताना विश्वस्त म्हणायचे वागताना थेट मालकासारखे वागायचे जनता सबकुछ जानती है असेच म्हणावे लागेल
अंबाजोगाई नगर परिषदेचे सिओ डॉ उत्कर्ष गुट्टे अत्यंत चांगले संवेदनशील अधिकारी म्हणून ख्याती प्राप्त होत असताना चिरीमिरी घेऊन जन्म मृत्यू नोंद प्रमाणपत्र दिले जात असल्याच्या प्रमाणा सह तक्रार आली मात्र सीओनी कुठलीच अद्याप भूमिका घेतली नसल्याचे समजते नगरपरिषद प्रशासनात कंत्राटी कर्मचाऱ्यांनी उच्छाद मांडला आहे आर्थिक पिळवणुकीची जबाबदारी कंत्राटी कर्मचाऱ्यावर पदाच्या कर्मचाऱ्यांनी दिल्याने सध्या केटली पेक्षा चहा जास्त गरम असल्याची नगरपरिषद परिसरात चर्चा होत आहे पदाच्या कर्मचाऱ्यांची काही जबाबदारी नाही का ? असाही सवाल केला जात आहे सीओ अत्यंत अनुभवी अधिकारी आहेत ते या संदर्भात काय निर्णय घेतात याकडे अंबाजोगाईकराचे लक्ष लागून आहे त्यांची निवडणूक आयोगाच्या सूचने नुसार बदली झाली होती त्यांनी निर्णयाच्या विरोधात न्यायालयात दाद मागितली होती तात्पुरता स्थगिती आदेश मिळाला त्या प्रकरणाच्या तारखा सुरू आहेत त्यांच्या सोबत अनेक स्वतः ला राजकारणातील किंगमेकर समजणारे सोबत असल्याचे समजते मात्र तारीख पे तारीख सुरू आहे त्यात ते व्यस्त असल्याचे समजते