जाहिरात न दिल्याने पत्रकारिता दबत नसते नेत्यांना कोणी सांगावे

.
अलीकडे राजकीय नेता कोणी असो कोणीही सत्य स्वीकारला तयार नाही प्रत्येकाला वाटते आमची जी भूमिका निर्णय असतील ते अंतिम आमच्या निर्णयावर नेतृत्वावर प्रश्न निर्माण करणारे तुम्ही कोण ? हा तर फरक पडलाय तुमच्या विचार करण्यावर तुम्ही 25 वर्षांपूर्वी आठवा तुम्ही कोण होतात काय करत होतात गावात तुमची मते किती होती तरी सर्वसामान्य जनतेने तुमचे नेतृत्व स्वीकारले तुमचे नेतृत्व कसे योग्य आहे रकान्याच्या रकाने हेच पत्रकार तुमच्याबद्दल लिहीत होते त्यावेळी तुम्हाला गुदगुल्या व्हायच्या त्यावेळी पत्रकार तुमच्यासाठी महत्त्वाचा घटक होता तुमच्या कोणत्याही भूमिका कशा जनहिताच्या आहेत हे जनतेसमोर पत्रकारांनी मांडले म्हणून जनतेला विश्वास वाटला तुम्हाला नेतृत्व म्हणून स्वीकारले
तुम्ही सामाजिक कार्यातून राजकारणातून आलात निवडणुकीचे राजकारण करत असताना पत्रकारांनी तुमच्या गुणदोषावर लिहिले त्यावेळी दोष शोधून सावरण्याचा प्रयत्न तुम्ही केला त्यावेळी अनेक वेळा पत्रकारांना तुम्ही विनंती केली बातमी करण्याच्या अगोदर सांगा सुधारणा झाली नाही तर तुमचे अधिकार वापरा यात अनेक वर्ष निघून गेली तुम्ही सामान्य कार्यकर्त्यापासून तुमचे असामान्य नेतृत्व तयार झाले जनतेने तुम्हाला कायम सत्ता सोपवली सत्तेच्या माध्यमातून तुम्ही अब्जाधीश नेते झालात हळूहळू पत्रकार कुसळासारखे डोळ्यात तुमच्या सळू लागले त्यातही तुम्ही इंग्रज नीती वापरली पत्रकारांमध्ये फोडाफोडी करून काही जवळचे बाकीचे लांबचे असे दोन गट पाडले तेही करण्यात तुम्ही यशस्वी झालात ज्या अंबाजोगाई शहराला विविध क्षेत्रातले वेगळेपणाची ओळख होती तीच पत्रकारिता क्षेत्रातही होती मात्र त्याला तुम्ही छेद देण्याचा प्रयत्न नव्हे यशस्वी झालात त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद द्यावे लागतील
अलीकडे सोशल मीडियाची शक्ती काय असते दिल्ली ते गल्लीपर्यंतच्या नेत्यांना समजली मग डिजिटल मीडियाच्या पत्रकारितेतला सुद्धा छेद देण्याचा प्रयत्न झाला स्वतःच्या समर्थक कार्यकर्त्यांच्या हातात 50 हजाराचा मोबाईल देऊन सकाळी उठल्यापासून झोपे पर्यंतचे फोटो व लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न होऊ लागला आहे एक गोष्ट नक्की ध्यानात घ्या जनता कोणावरही विश्वास ठेवत नाही विश्वासाला पात्र ठरावे लागते पत्रकारिता व भाटगिरी कधीही एकत्र नांदू शकत नाही पत्रकारांनी बातमीतून मांडलेले सत्य लोकांना पटते दुसरा ट्रेंड नवीन निघालाय सत्य लिहिणाऱ्यांना जाहिराती देणे बंद करणे यामुळे पत्रकाराचे विचार भूमिका बदलत नसते पत्रकारितेला सर्वसामान्य जनतेचा आधार असल्यास राजकीय नेत्यांनी जाहिराती बंद केल्याने पत्रकारितेत खंड पडत नाही एकदा राजकीय नेत्यांनी समजून घेतले पाहिजे एवढे तूर्त !