फडणवीस साहेब बॅनर काढण्याचे चिल्लर चाळे बंद करा



.
मनोज जरांगे पाटील यांची गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीका
माजलगाव (प्रतिनिधी)-
चलो मुंबई असे बॅनर लागलेले गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस बांधवांना आदेश देऊन गावागावात लावलेले बॅनर हटवण्यास सांगितल्याने मनोज जरांगे पाटील चांगलेच भडकले असून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा वर टीका करत म्हणाले की,फडणवीस साहेब असे चिल्लर चाळे बंद करा मी खानदानी मराठा आहे.मी ओबीसी मधूनच आरक्षण घेणार. मी सरकाराचा चहा सुद्धा पिलो नाही पण सरकारमधील आमदार, खासदार, मंत्री अंतरवाली मध्ये येऊन चहापाणी पिले असून महाजन साहेब तुमच्या दातातले अजून पोहे सुद्धा निघाले नाहीत अशी टीका संघर्ष योद्धा मनोज जरंगे पाटील यांनी दि.१० रविवार रोजी किट्टी आडगाव येथे झालेल्या सभेप्रसंगी केले यावेळी हजारो मराठा बांधव उपस्थित होते.
सत्तेचा गैरवापर करून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गावागावात लावलेले बॅनर काढण्याचे चिल्लर चाळे करू नये मराठा समाजाला विनाकारण त्रास देऊ नये.खोटे गुन्हे दाखल करू नये मी मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेत नसतो तुम्ही कितीही त्रास द्या माझ्यावर खोटे गुन्हे कितीही दाखल करा मात्र मी मराठ्यांना ओबीसी मधूनच आरक्षण मिळवून देणार अजूनही फडणवीस साहेब वेळ गेलेली नाही तुम्ही सगे सोयरे अंमलबजावणी करून मराठा समाजांना ओबीसीतूनच आरक्षण द्या तुम्ही दिलेले दहा टक्के आरक्षण टिकणार ही नाही आणि दहा टक्के दिलेले आरक्षणाचा आता झालेल्या नोकर भरती मध्येही लागू झाले नाही. ते दहा टक्के मराठा आरक्षण समाज घेणारही नाही.आरक्षण फक्त तुमच्या सरकारमधील २०० ते २५० लोकांनाच मान्य आहे. हे आरक्षण एकाही सर्वसामान्य मराठ्यांना मान्य नाही तुम्ही जे गावागावात लावलेले बॅनर काढत आहात या बॅनर वर काय दहशतवादी केंद्र असे लिहिले आहे.काय तर तुम्ही बॅनर हटवण्याचे आदेश पोलीस बांधवांना दिले आहेत. सत्तेचा गैरवापर करून मराठा समाजाला विनाकारण त्रास देण्याचे काम फडणवीस साहेब तुम्ही करू नका मराठा समाजाला मी ओबीसीतूनच आरक्षण घेतल्याशिवाय मी माघार घेत असतो तुम्ही कितीही त्रास द्या माझ्यावर खोटे गुन्हे किती दाखल करा मात्र मी मराठ्यांच्या लेकरा बाळांना ओबीसीतूनच आरक्षण घेऊन देणार व अजूनही तुमची वेळ गेलेली नाही सगे सोयऱ्याची अंमलबजावणी करून गोरगरीब मराठ्यांच्या पोरांना आरक्षण द्या. पुन्हा एकदा देशात मराठ्यांची ताकद दाखवून देण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे यासाठी ९०० एकर जागा उपलब्ध झाली असून आपल्याला १२०० एकर जागा लागणार आहे. याची लवकरच तारीख व ठिकाण कळवू यासाठी आपली टीम काम पाहत आहे. मी साधा सरकारचा चहा सुद्धा पिलो नाही या सरकारतीलच मंत्री, खासदार ,आमदार अंतरवली मध्ये येऊन अंतरवलीतील लोकांचा चहा, पोहे खाऊन गेले आहेत अजून महाजन साहेब तुमच्या दातातील पोहे सुद्धा निघाले नाहीत. तुम्हीच आंतरवालीत आया बहिणीच्या डोक्याच्या चिंदाड्या ऊडवल्या तर मी उपोषण करत असताना माझ्याकडून आया बहिणीवर शब्द गेला की नाही हे माहीत नाही तरी पण तुम्ही माझ्यावर एसआयटी लावली. एस आय टी लावली तरीही मी घाबरत नसतो मी जातिवंत मराठा आहे. माझ्यासोबत करोडोचा समाज आहे. मला जरी अटक केली तरी मी जेलमध्ये राहून जेलमध्ये कायद्यासोबत मराठा आरक्षणावर मोर्चा काढेल. तुम्ही सत्तेचा कितीही गैरवापर करा पण मी माझ्या करोडो समाज बांधवांना ओबीसी मधूनच आरक्षण मिळवून देणार असे किट्टी आडगाव येथील झालेल्या सभेप्रसंगी जरांगे पाटील यांनी केले.गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीका केली यावेळी किट्टी आडगाव परिसरातील हजारो मराठा बांधव उपस्थित होते.