शासकीय रुग्णालयाच्या अधिष्ठतापदी डॉक्टर शंकर धपाटेच

.
अंबाजोगाई (प्रतिनिधी)-
स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठातापदी डॉ शंकर धपाटे राहतील असे आदेश अवर सचिव बंदपट्टे यांनी काढल्याने आदेश येताच डॉ धपाटे यांनी डीन पदाचा अतिरिक्तपदभार घेतल्याचे समजते
पदभार घ्यायला आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे विषबाधा झालेल्या रुग्णांना पाहण्यासाठी अंबाजोगाईच्या रुग्णालयात आले त्यावेळी भलतेच जण पालकमंत्र्याच्या समोर समोर करत होते दिनांक 27 फेब्रुवारी रोजी पदभार कोणाला द्यावा या संदर्भात प्रस्ताव या कार्यालयाने यापूर्वीच दिला होता त्यानुसार प्रशासकीय कारणास्तव याच रुग्णालयातील शरीर रचना शास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ शंकर धपाटे यांनी त्यांच्या पदाचा कार्यभार सांभाळत अतिरिक्त पदभार डीन पदाचा पुढील आदेश होईपर्यंत सोपवन्यात येत असल्याचे म्हटले आहे यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे अवर सचिव यांनी शेवटी एक ओळ टाकली ती सर्वात महत्त्वाची आहे आयुक्त यांनी वेगळे आदेश काढण्याची आवश्यकता नाही असे म्हटले आहे त्यामुळे आता कोणताही बदल अशक्य वाटतो अधिष्ठाता डॉ धपाटे यांना या रुग्णालयात डीन पदाचा अतिरिक्त पदभार मिळावा यासाठी सत्ताधारी पक्षाचे स्थानिक नेते व पदाधिकारी प्रयत्नशील होते अशी माहिती आता समोर येत आहे
----------------------------------------------
भाजपमध्ये प्रवेश होण्याआधी राष्ट्रवादी शरद पवार गटाने निवडी जाहीर केल्या
अंबाजोगाई नगरपरिषद निवडणूक कधी होईल माहित नाही मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट व शरद पवार गट दोन्ही गटातील अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश घेत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे दोन प्रमुख स्थानिक पदाधिकारी शेख रौफभाई व बालाजी शेरेकर दोघेजण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे शहराच्या चौका चौकात बॅनर झळकताच भाजपमध्ये प्रवेश होण्याआधी त्यांच्या जागी नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्याचे दिसते महिला शहराध्यक्षपदी श्रीमती चंद्रकला आनंदराव देशमुख , राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या शहराध्यक्षपदी ॲड शहाजान खान करीम खान, कार्याध्यक्षपदी गोविंद टेकाळे, तालुका सरचिटणीस पदी रवींद्र वसंतराव मोरे यांच्या निवडी करून त्यांचा सत्कार करण्यात आला आगामी काळात इतरही अनेक पक्षातून प्रमुख कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची यादी मोठी असून त्यांचा हळूहळू भाजप मध्ये प्रवेश दिला जात असल्याची चर्चा होत आहे नगरपरिषदेत काय होणार सत्तांतर होईल का नाही हा येणारा काळ ठरवेल अशीही चर्चा होत आहे