अंबाजोगाई शहरातील महिला संघटना महिला दिनी शांतच का

सब टायटल: 
इतर महिलांनी पुढाकार घेऊन महिला आघाडी स्थापन करावी
Rajkiya

.

             अंबाजोगाई (प्रतिनिधी)- 

आज महिला दिन आहे महिला वरील होणारे अन्याय अत्याचार विरुद्ध सर्वात प्रथम अंबाजोगाई शहरातून आवाज बुलंद व्हायचा आज तो आवाज कानावर का पडत नाही महिला वरील अन्याय अत्याचार बंद झालेत का की कमी झालेत नाही ना ? तरीही कोणीही महिला किंवा महिला संघटना आवाज उठवायला तयार नाहीत महिला संघटना महिला दिनी ही शांतच का ? असाही सवाल केला जात असून इतर महिलांनी पुढाकार घेऊन अंबाजोगाई शहरात महिला आघाडी मंच स्थापन करून पुढे आले पाहिजे अशी ही मागणी जनतेतून होत आहे

                 अंबाजोगाई शहरात मानवलोक व मनस्विनी अशा दोन पातळीवर लोहिया दांपत्य सामाजिक कार्यात काम करत होते महिलांच्या प्रश्नावर स्वर्गीय शैलाताई लोहिया यांनी अनेक वर्ष संघर्ष केला अनेक महिलांना न्याय मिळवून दिला त्यानंतर प्राध्यापक धुळे मॅडम ,पोटभरे मॅडम ,प्रा प्रतिभा देशमुख, प्रा अरुंधती लोहीया अअनेक महिला नेत्यांनी स्वर्गीय शैला लोहिया यांचा वारसा पुढे चालवला आज अंबाजोगाई शहरच काय जिल्ह्यात अनेक ठिकाणी महिला वरील अन्याय अत्याचाराची प्रकरणे घटना होत असूनही त्या पीडित महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी जाऊ द्या अन्याय होत आहे तो दूर करावा एवढी साधी मागणी कोणी करत असल्याचे सध्यातरी दिसत नाही नगरपरिषद, महानगरपालिका, जिल्हा परिषद पंचायत समिती ,ग्रामपंचायत निवडणुकीत आरक्षण असल्याने फक्त उमेदवारी अर्ज भरणे निवडणूक लढववली पाच वर्षे महिलांची चर्चा होत नाही अंबाजोगाई शहरात दहा  मार्च रोजी "मी तुमची सावित्रीबाई फुले" एकपात्री नाट्यप्रयोग कार्यक्रम आंबेडकर प्रबोधिनीने आयोजित केला आहे संयोजक जगतकर ,बनसोडे ,आदमाने सरवदे, आचार्य ,सोनकांबळे घोबाळे, ठोके ,राठोड, पारवे आहेत अंबाजोगाई नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा रचना मोदी सह 14 माजी नगरसेविका आहेत जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शिवकन्या शिरसाठ तसेच पंचायत समितीच्या अनेक महिला सभापती, उपसभापती पदावर विराजमान होत्या आज एकही लोकप्रतिनिधींना महिलादिनी कार्यक्रम आयोजित करावा का वाटला नाही किंवा वाटू नये अशी ही जनतेतून चर्चा होत आहे