सग्या सोयऱ्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय गावात पाऊल ठेवायचा नाही

सब टायटल: 
संभाव्य उमेदवार जयसिंगराव गायकवाड यांना तालखेड गावातून काढता पाय घ्यावा लागला
Rajkiya

.

             माजलगाव (प्रतिनिधी) -

मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशाने राजकीय नेत्यांना सग्या सोयऱ्याची अंमलबजावणी केल्याशिवाय गावात पाऊल ठेवू द्यायचे नाही  सांगितल्यानुसार
 आज दुपारी  दरम्यान केंद्रीय माजी राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड हे आगामी लोकसभा निवडणुकीच्या माजलगाव तालुक्यातील तालखेड येथे कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीसाठी आज दुपारी ३वाजण्याच्या सुमारास  गावात गेले असता. गावातील मराठा आरक्षण आंदोलनाचे कार्यकर्ते सोपान शिंदे, दत्ता गवळी,श्रावण गवळी गणेश कदम अशोक कोठुळे, यांनी 
आमच्या गावात व दारात कोणत्याच पक्षाच्या नेत्यांनी येऊ नका म्हटलं तरी आपण का आलात ? असे म्हणत माजीकेंद्रीय राज्यमंत्री राष्ट्रवादीचे नेते जयसिंगराव गायकवाड यांना मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी गावात पाऊल ठेवून नका म्हणून गावाबाहेर पाठवले 
              यामुळे शासन मराठा आरक्षणाच्या सगे सोयऱ्याच्या अध्यादेशाची अंमलबजावणी जोपर्यंत करत नाही तोपर्यंत मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांचा रोष राजकीय नेत्यांना घ्यावा लागत आहे.