निजामकाळापासूनचा जमिनीचा तिढा नंदकिशोर मुंदडांनी तीन महिन्यात सोडवला

सब टायटल: 
शेतकऱ्यांनी जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा व तहसीलदार यांचे मानले आभार
Rajkiya

.

             अंबाजोगाई (प्रतिनिधी )-

निजामकाळात चिचखंडी येथील लोकांना जमिनी तर मिळाल्या, परंतु या जमिनी पोटखराब क्षेत्रात असल्याने शेतकऱ्यांना कुठल्याही शासकीय योजनांचा लाभ घेता येत नव्हता. याबाबत शेतकऱ्यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर यांच्यासमोर गाऱ्हाणे मांडल्यानंतर त्यांनी सातत्याने पाठपुरावा करत अवघ्या तीन महिन्यात या जमिनी पोटखराब क्षेत्रातून काढून दिल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

         अंबाजोगाई तालुक्यातील चिचखंडी येथील ६८ शेतकऱ्यांना निजामकाळात जमिनी देण्यात आल्या होत्या. परंतु, सातबारावर या जमिनींची नोंद पोटखराब क्षेत्रात असल्याने शेतकऱ्यांना पीकविमा, विहीर, ठिबक, पाईपलाईन आदि साठीच्या शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागले. अनेक दशकांचा हा प्रश्न घेऊन हे शेतकरी तीन महिन्यापूर्वी चिचखंडीचे माजी सरपंच गुणवंत बिरगड यांना घेऊन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर यांच्या भेटीला गेले. मुंदडा यांनी प्रश्न बारकाईनेसमजावून घेत लगोलग त्याचा पाठपुरावा सुरु केला. यामध्ये अंबाजोगाईचे तहसीलदार विलास तरंगे यांनी सकारात्मक भूमिका घेत हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले. अखेर नंदकिशोर मुंदडा यांचा पाठपुरावा आणि तहसीलदार विलास तरंगे यांचे प्रयत्नातून यातील सर्व त्रुटी दूर करण्यात आल्या आणि सर्व शेतकऱ्यांच्या जमिनीची नोंद पोटखराब क्षेत्रातून काढून नियमित क्षेत्रात घेण्यात आली. त्यामुळे या सर्व शेतकऱ्यांना शासनाच्या शेतीविषयक सर्व योजनांचा लाभ मिळणे शक्य होणार आहे. या बदलाचा नवीन सातबारा मुंदडा यांनी बुधवारी (दि.०६) शेतकऱ्यांकडे सुपूर्द केला. यावेळी आनंदी झालेल्या शेतकऱ्यांनी नंदकिशोर मुंदडा व तहसीलदार विलास तरंगे यांचा सहृदय सत्कार करून त्यांचे आभार मानले.