आ.नमिता मुंदडाच्या प्रयत्नांमुळे अंबाजोगाईत विकास कामांचा महापूर

सब टायटल: 
शहरांच्या विकास कामांकडे मुंदडांनी केले लक्ष केंद्रित
Rajkiya

.

           अंबाजोगाई (प्रतिनिधी)- 

         केज विधानसभा मतदार संघाच्या विकासाभिमुख आमदार नमिता मुंदडा यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे केज मतदारसंघासह अंबाजोगाई शहरात विकास कामाचा महापुर आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. वेगवेगळ्या फंडातून अंबाजोगाई शहरांच्या सर्वागीण विकासकामांकरिता येत आहे. शहरातील अंतर्गत रस्त्यांकरिता आमदार नमिता मुंदडा यांच्या आमदार फंडातून यशवंतराव चव्हाण चौकालगत असलेल्या टिळक नगर येथून दक्षिणमुखी हनुमान मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम मुंदडांच्या फंडातून करण्यात आले आहे.आ.नमिता मुंदडा यांनी दिलेल्या शब्दानुसार वेळेत व उत्तम दर्जाचे काम याभागात केले आहे.टिळक नगर येथून दक्षिणमुखी हनुमान मंदीरासमोर पेव्हर ब्लॉक टाकण्यात आले आहेत.तसेच प्रभाग क्र.१४ येथील सर्वच रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्यात येणार असून याभागातील रस्ते खड्डे मुक्त होणार आहेत.

            आ.नमिता मुंदडा यांनी शहरासाठीच्या विकास कामांकडे स्वता लक्ष केंद्रित केले असून.प्रत्येक कामांकडे स्वता लक्ष देत आहेत.शहर असो शहरातील अंतर्गत रस्त्यांची वारंवार होणारी दुरावस्था लक्षात घेऊन सिमेंट काँक्रीटचे पक्के रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी शासनाकडे पाठपुरावा सुरुचं ठेवला आहे.आ.नमिता मुंदडा यांनी प्रभाग क्र.१४ येथील रस्त्याच्या कामाकरिता 30 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता.याबद्दल बीड जिल्ह्याच्या खा. प्रीतम मुंडे, केज विधानसभेच्या आ.नमिता मुंदडा यांचे टिळक नगर येथील नागरिकांनी विशेष आभार व्यक्त केले आहेत.शहरातील अंतर्गत असो की प्रमुख रस्ते, गल्ली बोळातील रस्त्यांचे देखील रूपडे बदलत असल्याने अंबाजोगाईकर मात्र खुश आहेत.सर्व जाती-धर्माच्या धार्मिकस्थळांना, रस्त्यांना, शासकीय कार्यालयाच्या इमारतींना मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध झाला आहे, शहरात होत असलेल्या सर्व समावेशक विकास कामाबद्दल नागरिकातून समाधान व्यक्त केले जात आहे.