विडा प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळाला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा

सब टायटल: 
आ. नमिता मुंदडांनी केली वचनपूर्ती
Rajkiya

.

        केज -(प्रतिनिधी )-

          केज तालुक्यातील विडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळवून देण्याचा शब्द आमदार नमिता मुंदडा यांनी दिला होता. या शब्दाला अनुसरून आ. मुंदडा यांनी आग्रहाने पाठपुरावा केल्यानंतर राज्य शासनाने विडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने विडा आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागातील रुग्णांना वेळेवर आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळणे शक्य होणार आहे.

विडा ही केज तालुक्यातील महत्वाची बाजारपेठ आहे. आजूबाजूची २५ पेक्षाही अधिक खेडी या बाजारपेठेवर अवलंबून असल्याने येथे वर्दळ असते. साहजिकच येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातही दररोज २५० ते ३०० रुग्ण उपचारासाठी येत असतात. वाढत्या लोकसंख्येच्या मानाने हे प्राथमिक आरोग्य केंद्र सुविधा पुरविण्यास असार्थ ठरू लागले होते. आजारी व अपघातग्रस्त व्यक्तींना बीडच्या शासकीय रुग्णालयात घेऊन जावे लागते. हे अंतर दूरवर असल्यामुळे अनेक रुग्णांनी वेळेत उपचार न मिळाल्याने प्राण गमावलेले आहेत. त्यामुळे या भागासाठी ग्रामीण रुग्णालयाची नितांत आवश्यकता होती. हि बाब लक्षात घेत आ. नमिता मुंदडा यांनी मागील चार वर्षापासून विडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणीवर्धन करण्याची मागणी राज्य शासनाकडे करून त्यासाठी पाठपुरावा सुरु ठेवला होता. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून राज्य शासनाने विडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा दर्जावाढ करण्याचा निर्णय घेतला असून लवकरच या ठिकाणी आता तीस खाटांचे ग्रामीण रुग्णालय होणार आहे. त्यामुळे विडा आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागाला चांगली आरोग्यसेवा मिळणे शक्य होणार आहे. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, बीडच्या खासदार प्रीतमताई मुंडे यांचे आ. नमिता मुंदडा यांनी आभार मानले आहेत.

बनसारोळा रुग्णालयासाठी प्रयत्न सुरू
 
           आडस, विडा पाठोपाठ बनसारोळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणीवर्धन करण्यासाठी देखील प्रयत्न सुरू आहेत. सदरील प्रस्तावात काही त्रुटी आहेत. या त्रुटी दूर होताच बनसारोळाला देखील ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळणे सुकर होईल.

         आ. नमिता मुंदडा, विधानसभा सदस्य केज मतदार संघ