अंबाजोगाई येथील लोक न्यायालयात अनेक तुटणारे संसार पुन्हा जुळले

सब टायटल: 
दोन प्रकरणात तडजोड होऊन पती पत्नी एकत्र राहण्याचा घेतला निर्णय
Sampadkiya

.              अंबाजोगाई (प्रतिनिधी )- 
 
            तीन मार्च, २०२४ रोजी जिल्हा व सत्र न्यायालय तसेच दिवाणी न्यायालय व. स्तर अंबाजोगाई येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आलेले होते. राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये दाखलपुर्व व प्रलंबीत दिवाणी व फौजदारी १४५९ प्रकरणे मोठ्या संख्येने निकाली निघाल्याचा उच्चांक केला आहे. तसेच सदर प्रकरणांत रू. ३०६६३९२१/- इतकी रक्कम वसूल झाली. 
सदर लोकन्यायल्यात दोन प्रकणात घटस्फोट होण्याऐवजी दोन्ही पक्षकारांना समजावून सांगून मा.न्यायाधीश श्री.बोरफळकर साहेब व श्री वाघ साहेब यांनी दोन प्रकरणात महिलेस तिचे पती सोबत नांदावयास पाठविले, दोन्ही प्रकरणातील पक्षकार पती व पत्नी यांचा सत्कार न्यायाधिश यांनी केला व पती पत्नी याना एकमेकास पेढा भरविण्यास सांगितले.
                 सदर राष्ट्रीय लोक अदालत यशस्वी करणेकरीता मा. दिपक द. खोचे, जिल्हा न्यायाधीश-१, अंबाजोगाई, मा. संजश्री जे. घरत, जिल्हा न्यायाधीश-२, अंबाजोगाई, मा. विक्रमादित्य कि. मांडे, जिल्हा न्यायाधीश-३, अंबाजोगाई, मा. जयश्री एस. जगदाळे दिवाणी न्यायाधीश व. स्तर, अंबाजोगाई, मा. माणिक ये. वाघ, सह दिवाणी न्यायाधीश, व. स्तर, अंबाजोगाई, मा. परेश आर. वागडोळे, २रे सह दिवाणी न्यायाधीश व. स्तर, अंबाजोगाई, मा. जुबेर जाप्फर खॉन, सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर, अंबाजोगाई, मा. नागनाथ च. बोरफळकर, २रे सह दिवाणी न्यायाधीश क.स्तर, अंबाजोगाई, मा. सचिन दु. मेहता, ३रे सह दिवाणी न्यायाधीश क.स्तर, अंबाजोगाई, मा, बालवीर एन. गोडबोले, ४थे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर, अंबाजोगाई तसेच श्री. ए. बी. कवडे, अध्यक्ष वकील संघ,  श्री. एम.आर,सुगरे, सचिव वकील संघ,  श्री. एस.एन.केंद्रे,उपाध्यक्ष वकील संघ,  श्री. बी.ए. पुरी,ग्रंथपाल वकील संघ,  श्री. व्ही. बी.भुरे सहसचिव, वकील संघ, 
व सर्व विधीज्ञ अंबाजोगाई तसेच अधिक्षक व न्यायालयीन कर्मचारी यांच्या अथक परिश्रमाने सदरचे लोकन्यायालय यशस्वीरित्या पार पडले.