आमदार नमिताताई मुंदडांनी अडीच हजार घरकुल मंजुरीची केली शासनाकडे मागणी

.
अंबाजोगाई (प्रतिनिधी)-
अंबाजोगाई शहराला गेल्या अनेक वर्षापासून पंतप्रधान आवास योजना व रमाई घरकुल योजनेतून लाभ मिळत नव्हता आमदार मुंदडा तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या प्रयत्नातून प्रथमच अंबाजोगाई शहराला 54 रमाई घरकुल योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले आहेत आणखीन अडीच हजार रमाई घरकुल योजनेतून घरकुल मंजूर करावेत अशी मागणी आमदार नमिताताई मुंदडा यांनी राज्य शासनाकडे केली असल्याचे समजते
अंबाजोगाई शहरात पात्र लाभार्थी असूनही 2011 पासून नगर परिषदेमार्फत या संदर्भात प्रयत्न का झाले नाहीत याला कोण जबाबदार ? या संदर्भात कोणीही तोंडातून ब्र शब्द काढायला तयार नाही यापूर्वी बीड ,गेवराई ,माजलगाव, परळी या शहरात रमाई घरकुल योजनेची अंमलबजावणी झाली प्रस्ताव मंजुरीसाठी छत्रपती संभाजीनगर येथील बिलकॉन कन्सल्टन्सीची महत्त्वाची भूमिका राहिली आहे अंबाजोगाई शहरात मंजूर झालेल्या 54 घरकुलाच्या मंजुरी संदर्भात तसेच आमदार नमिताताई मुंदडा यांनी केलेल्या शिफारशीनुसार रमाई घरकुल योजनेचे प्रस्ताव मंजुरीसाठी कन्सल्टन्सीचे संचालक आयुब खान पठाण मंजुरीसाठी प्रयत्न करत असल्याचेही समजते ही योजना राबवली गेली तर अंबाजोगाई शहर झोपडपट्टी मुक्त शहर म्हणून भविष्यात ओळखले जाईल अशी ही चर्चा होत आहे