रमाई घरकुल योजनेची चर्चा होते पंतप्रधान आवास योजनेचे काय ?

.
अंबाजोगाई (प्रतिनिधी)-
शहरासाठी रमाई आवास योजनेअंतर्गत तब्बल 54 लाभार्थ्यांना रमाई घरकुल योजनेअंतर्गत घरकुले मंजूर झाली गेली अनेक वर्षापासून या योजनेअंतर्गत मंजुरी मिळत नव्हती केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिताताई मुंदडा यांनी यासाठी विशेष प्रयत्न करून लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी आणली समर्थकांसह विरोधी गटाचे मंडळी आमदाराचे अभिनंदन करत आहेत यासोबतच एवढ्याच तोलामोलाची पंतप्रधान आवास योजना आहे या योजनेत अनेकांचा ज्यांना घर नाही अशांचा समावेश होऊ शकतो ही संख्या शहरात बरीच मोठी आहे या योजनेच्या अंमलबजावणीचे काय ? असाही सवाल केला जात आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एखाद्या योजनेचे प्रस्ताव पाठवणे ही त्यांची जबाबदारी आहे कर्तव्य आहे मेहरबानी नव्हे अशीही चर्चा होत आहे
केज मतदार संघातील विकास कामासाठी राज्य शासन पाण्यासारखा धो धो निधीचा केज विधानसभा मतदारसंघावर पाऊस पाडत आहे आमदारांचे अभिनंदन किती करावे तेवढे कमीच आहे करोडो रुपयाचा निधी येण्याची प्रक्रिया विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होईपर्यंत सुरूच राहील असा अंदाज वर्तविला जात आहे पूर्वी पश्चिम महाराष्ट्रातील विविध आमदाराच्या मतदारसंघात असा पावसासारखा धो धो निधीचा पाऊस पडत असायचा मात्र आमदार नमिताताई मुंदडा यांनी राज्य शासनाकडून निधी कसा मिळवत आहेत कोणालाच कळायला मार्ग नाही बीड जिल्ह्यात भाजपाच्या त्या एकमेव आमदार आहेत असे नाही बीड जिल्ह्यात नव्हे तर अख्या मराठवाड्यात आज तरी आमदार नमिताताई मुंदडा यांनी जेवढा निधी आणला तेवढा इतर कोणत्याही आमदारांना निधी आणण्यात यश आले नाही निधी आणण्यात आमदार मुंदडा मराठवाड्यात आघाडीवर आहेत
शासनाकडून विशेष प्रयत्न करून योजना मंजूर करून आणली तर त्या लोकप्रतिनिधीचे समर्थकच काय विरोधक सुद्धा अभिनंदन करतात आमदार मुंदडांचे आज तेच होत आहे विरोधक सुद्धा अभिनंदन करत आहे मात्र योजनेचा प्रस्ताव पाठवणे पाठवताना अचूक पाठवणे त्रुटी निघाली तर त्रुटीची पूर्तता करणे मंजुरी आल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना त्याचा लाभ देणे ही तर लोकसेवक म्हणून प्रशासकीय अधिकाऱ्याची ड्युटी आहे कर्तव्य आहे रमाई घरकुल योजने संदर्भात अंबाजोगाई नगर परिषदेचे प्रशासक तथा सिओ डॉ उत्कर्ष गुट्टे यांनी सुद्धा प्रशासकीय कामकाजाचा भाग म्हणून कर्तव्य बजावले तो त्यांनी उत्तमरीत्या केले एवढेच लाभार्थ्यांना जास्तीत जास्त लाभ मिळावा यासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्र वेळेच्या आत पाठवले
अलीकडे अंबाजोगाईच्या राजकारणात राजकीय नेत्या कार्यकर्त्यांसोबत प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही अप्रत्यक्षरीत्या राजकारणात ओढले जात असल्याची चर्चा होत आहे योजना मंजूर करून आणली लोकप्रतिनिधीचे जरूर अभिनंदन झाले पाहिजे मात्र त्यात अधिकाऱ्यांचा समावेश असणे ही नवीन प्रथा रूढ होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे प्रशासन चालवताना प्रशासकीय कामकाजात चुका होतच असतात होत नाहीत असे नाही प्रशासकीय अधिकाऱ्याची लोकसेवकाची भूमिका असते ती राजकीय नेत्याची होऊ शकत नाही त्यामुळे एखाद्या योजनेच्या मंजुरीमध्ये अधिकाऱ्याचे अभिनंदन करण्याचा नवीन पायंडा पडू नये अशीही चर्चा जनतेतून ऐकवायला मिळत आहे