बुट्टेनाथ परिसरातील बिबट्याला आमचा जीव घेतल्यानंतर जेरबंद करणार आहात का ?

सब टायटल: 
40 शेतकऱ्यानी वन खात्याकडे केली लेखी निवेदनाद्वारे केली मागणी
Shet Shivar

.

          अंबाजोगाई (प्रतिनिधी)-

अंबाजोगाई शहरालगत वन विभागाची हजारो एकर जमीन आहे त्यालगत अनेक शेतकऱ्यांच्या ही जमिनी आहेत गेली दोन वर्षांपासून शेतकरी लेखी तोंडी तक्रार करत होते बुट्टेनाथ परिसरात बिबट्या दिसला त्या शेतकऱ्यांना वन अधिकारी म्हणायचे कोणी बघितले सांगा बिबट्या पहिल्या असे म्हणणाऱ्या शेतकऱ्यांना नंतर वन खात्याचे अधिकारी कर्मचारी काय त्रास देत होते अनेकांनी तो अनुभव अनुभवला आहे आता मात्र तब्बल 40 शेतकऱ्यांनी वन विभागाला लेखी निवेदन देऊन बुट्टेनाथ परिसरात वावर असलेल्या बिबट्याला आमचा जीव घेतल्यानंतर  जेरबंद करणार आहात का ? असा सवाल चाळीस शेतकऱ्यांनी वन खात्याच्या अधिकाऱ्यांना लेखी निवेदनाद्वारे केला आहे

                 बुट्टेनाथ परिसरात असणाऱ्या वनविभागाच्या जमिनीत विविध योजना शासनामार्फत राबवण्यासाठी करोडो रुपयाचा निधी शासन देत आहे मात्र प्रत्यक्षात या निधीतून कोणती व कशी कामे होतात हे पाहायला प्रशासकीय अधिकारी तहसीलदार उपजिल्हाधिकाऱ्यांना वेळ नसल्याने शासनाच्या निधीचा नेमका कसा व किती वापर होत आहे असा प्रश्न सतत नागरिकांतून होत असतो बुट्टेनाथ परिसरात बिबट्याचा वावर आहे असे वनाधिकारी कबूल का करत नाहीत असा प्रश्न नागरिकांना, शेतकऱ्यांना केला असता एक शेतकरी म्हणाला बुट्टेनाथ परिसरातील वनखात्याच्या जमिनीवर निगराणी ठेवण्यासाठी अनेक कर्मचारी अधिकारी आहेत मात्र ते फक्त मुख्य रस्त्याने गस्त घालतात बिबट्या आहे असे कबूल केले तर बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी अथवा जखमी प्राण्याचे पंचनामे करण्यासाठी डोंगरात पायी जायची पाळी त्यांच्यावर येते हे टाळण्यासाठी वनाधिकारी कितीही ओरड झाली बिबट्या आहे तरी ते कबूल करत नाहीत

उघडा डोळे आणि बघा नीट

         वन अधिकारी व कर्मचारी बिबट्याचा वावर नाही असा दावा करत असले तरी काही दिवसापूर्वी बुट्टेनाथ परिसरात बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे ही बाब दाबण्याचा वनखात्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्याकडून बराच प्रयत्न झाला मात्र ही बाब आता लपून राहिली नाही आता वनविभागाला सुद्धा कबूल करावे लागले लागणार असल्याने वन अधिकारी यांनी खालच्या कर्मचाऱ्यावर राग काढायला सुरुवात केल्याचे समजते सर्वात महत्त्वाचे म्हणजे या परिसरात ज्यांची शेती आहे त्यात तब्बल 40 शेतकऱ्यांनी वनपरिक्षेत्र कार्यालय परळी वैजनाथ उपजिल्हाधिकारी अपर जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन देऊन बुट्टेनाथ परिसरात वावर असणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्याची लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे निवेदनकर्त्या शेतकऱ्यांनी वन अधिकाऱ्यांना प्रश्न केला आहे आमचा जीव घेतल्यानंतर आपल्याला जाग येणार आहे का ? 

         निवेदनावर मेहबूब गवळी, रमजान गवळी, रणू गवळी ,इब्राहीम गवळी, महंमद गवळी ,सलीम गवळी, हुसेन गवळी, हमीद गवळी,सुग्राबी गवळी ,रजियाबी गवळी, जरीना बी गवळी ,अमिनाबी गवळी, सकीनाबी गवळी, शेख मुसा, शेख गफूर ,शेख इब्राहिम, शेख इस्माईल ,चांद पप्पूवाले याकुब  पप्पूवाले ,शकील पप्पूवाले मोसिन गवळी ,मजहर गवळी, रेहान गवळी ,नसीर गवळी, सईद गवळी, अहमद गवळी, खालेद गवळी, रहीम गवळी, सलीम गवळी, पाशा गवळी, अल्लाबक्ष मुन्नीवाले, रहीम मुन्नी वाले , जुनेद मुंनिवाले, सादेक गवळी , सोफियान मुन्नीवाले, शेख कासम पप्पूवाले आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत वनाधिकारी या संदर्भात काय भूमिका घेतात याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे