स्वा. रा. ती. च्या परिचारिकेने स्वतः चा जीव धोक्यात घालून वाचवले चिमुकल्याचे प्राण.


.
अंबाजोगाई (प्रतिनिधी )-
येथील स्वा रा ती च्या पाच सहा परिचारिका मिळून कार्यालयासमोर असणाऱ्या महादेव मंदिरामध्ये दर्शनासाठी गेल्या होत्या. त्यावेळी भक्तासाठी ठेवलेल्या बाकड्यावर एक चिमुकला खेळत होता.तो बाकडा त्याच्या अंगावर पडला.तो बाकडा उचल्यामुळे प्रतिक कांबळे या ७ वर्षे वयाच्या मुलाचा जीव वाचवला पण तो बाकडा परिचारिका कविता फड यांच्या पायावर पडून पायाचा चुराडा झाला.
स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिपरिचारीका कार्यालयासमोर महादेव मंदिर आहे. त्या मंदीरात दर्शनासाठी स्वारातीचे कर्मचारी महिला तर परिसरातील चिमुकले हे खेळण्या बागडण्यासाठी येत असतात. मंदीर परिसरात भाविकांना बसण्यासाठी सिमेंट बाकडे बसवलेले आहेत. त्या बाकड्यावर महिला, वयोवृध्द बसतात तर बाकड्यावर चिमुकले खेळत बागडत आसतात त्या सिमेंट बाकड्यावर ७ वर्षाच्या वयाचा चिमुकला प्रतिक कांबळे हा खेळण्यात व्यस्त होता त्याचवेळी त्याच्या अंगावर सिमेंटचे 200 किलोचे बाकडे त्याच्या अंगावर पडले त्यावेळी त्याने जोरात आई मला वाचव म्हणून हाक मारली त्या जवळच असलेले परिचारीका सौ.कविता फड, सौ .उषा राठोड,राणी मुंडे,मंदाकिनी भोपळे,स्वाती मुखेडकर, दैवशाला ठाकूर या मंदीरात दर्शनाला आल्या होत्या.
प्रतिक कांबळे या चिमुकल्याच्या हाकेच्या जवळ असलेल्या परिचारीकांच्या कानी ती आर्त हाक पडताच सर्व जनीच्या मनात ममत्व जागे झाले. क्षणाचा ही विलंब न करता त्या धावत मुलाकडे येऊन त्याच्या अंगावरचा बाकडा बाजुला सारून त्याला जिवदान दिले खरे पण तो सिमेंटचे बाकडे परिचारीका कविता फड यांच्या पायावर पडल्याने पायाचा चुराडा झाला. त्यांच्यावर स्वारातीमध्ये उपचार सुरु आहेत. माझा कायमस्वरूपी पाय आदु झाला याची खंत मनात असली तरी एका चिमुकल्याचा जिव वाचला याचा आनंद असल्याची भावना कविता फड यांनी व्यक्त केली आहे. फड व सहकारी परिचारिकेत एक आई जागी झाल्यामुळे मुलाचा जिव वाचल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत असुन स्वाराती अधिसेवीका कार्यालयाच्या वतीने कविता फड यांच्या कार्याचे कौतुक करुन सन्मान केला.