उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना आपलेसे करणे सर्वानाच जमेल सांगता येणार नाही


.
अंबाजोगाई (अ.र.पटेल )-
अंबाजोगाई शहराचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाली ही बाब तर अभिनंदनीय आहेच मात्र यापेक्षा अजित दादा पवार सारख्या शिस्तीच्या नेत्याला आपलेसे करणे त्यापुढे जाऊन दोन दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगर येथे जाहीर कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी राजकिशोर मोदी व त्यांचे सुपुत्र संकेत मोदी यांच्या बद्दल जी स्तुती केली ती पदापेक्षाही किती पटीने तरी जास्त महत्त्वाची आहे असे अंबाजोगाईकराना वाटते
पक्ष कोणताही असो काँग्रेस पक्षात पापा मोदी यांना स्वर्गीय विलासराव देशमुख यांनी राज्यस्तरावरील अशी कोणतीही पदे शिल्लक राहिली नसतील की त्या पदावर मोदी यांची त्यांनी नियुक्ती केली राजकिशोर मोदी यांच्या स्वभावामध्ये असा नेमका कोणता गुण आहे जेणेकरून स्वर्गीय विलासराव देशमुख असतील नांदेडचे अशोकराव चव्हाण असतील आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार असतील पालकमंत्री धनंजय मुंडे या सर्व नेत्यांना आपलेसे करणे अनेकांना जमले नाही अनेकांनी खूप प्रयत्न केला विश्वास संपादन करण्याचा मात्र ते शक्य झाले नाही राजकिशोर मोदी हे अल्पसंख्यांक समाजामधून येत असताना सुद्धा गेली पंधरा-वीस वर्षापासून ते अंबाजोगाई शहराच्या राजकारणात आपली पकड मजबूत करून आहेत अंबाजोगाई पीपल्स बँक व योगेश्वरी नागरी पतसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी आपल्या नेतृत्वाचा ठसा उमटवला त्यांना विधान परिषदेचे आमदार होण्याची तीव्र इच्छा असली तरी ही लाईन फार मोठी असल्याने सध्या तरी शक्यता वाटत नाही
राज्यातील नगरपरिषदांची मुदत संपल्यामुळे कोणतीही नगरपालिका किंवा महानगरपालिका सद्यस्थितीत अस्तित्वात नाही अंबाजोगाई नगर परिषदेच्या माध्यमातून मोदींचे राजकारण चालते मात्र निवडणुका नसल्यामुळे व राजकीय परिस्थिती बदलल्यामुळे राजकारणात मोदींचा कार्यकाळ अडचणीत असताना त्यांनी यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला होता राष्ट्रवादीचे दोन भाग झाले मोदी मात्र अजित दादाच्या व पालकमंत्री धनंजय मुंडे सोबत कायम राहिले दोन दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर येथे अंबाजोगाई पीपल्स बँकेच्या शाखेचा उद्घाटन समारंभ होता यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जाहीर कार्यक्रमात माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांना नगरपरिषदेच्या राजकारणात समर्थपणे पाठीशी उभे राहण्याची जो विश्वास दिला अजित दादा पवार सहसा कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची जाहीर कबुली ते सहसा देत नाहीत मात्र मोदींच्या बाबतीत अजितदादांनी सढळ हाताने राजकीय आश्वासन दिल्यामुळे राजकिशोर मोदी यांना राजकारणात बुस्टर डोज मिळाला असताना त्यानंतर लगेच त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवडीची घोषणा करण्यात आली त्यामुळे अजित दादा पवार हे राजकिशोर मोदी यांच्या पाठीशी किती खंबीरपणे उभे आहेत हेच यावरून स्पष्ट होते राजकिशोर मोदी यांना हा बूस्टर डोस अत्यंत आवश्यक असताना त्या काळामध्ये अजित दादांनी मोदी यांना राजकीय पाठबळ दिल्यामुळे मोदी गटाला मरगळ आली असताना या दोन घटनेमुळे मोदी समर्थक आनंदी दिसत आहेत निवडीचा आनंद फटाके वाजवून जल्लोष व्यक्त केला विशेष म्हणजे जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यामार्फत ही त्यांच्या शिफारशीवरून शहरातील काही भागात मोदी यांनी शिफारस केलेल्या कामांना निधी मंजूर झाल्याची माहिती मिळत आहे एकूण राजकीय परिस्थिती राजकिशोर मोदी यांच्या बाजूने होत असल्याने मोदी समर्थकांना राजकीय बळ मिळत असल्याची चर्चा होत आहे