जरांगे पाटलांसह ५९ आंदोलकावर गुन्हा दाखल !

.
शिरूरकासार (प्रतिनिधी )-
मराठा आरक्षण प्रश्नावर झालेल्या रास्ता रोको आंदोलनात तालुक्यात मनोज जरांगे पाटलांसह ५९ आंदोलकावर शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
शिरूर तालुक्यात रविवारी दहा ठिकाणी रास्ता रोको आंदोलन झाले ,दरम्यान नांदूर ते शिरूर व अमळनेर ते बीड रोडवर नांदूर फाटा येथे मराठा समाजाने रास्ता रोको आंदोलन केले सदरील आंदोलनात मनोज पाटील जरांगे यांचे तोंडी आदेशानुसार गैरकायद्याची मंडळी जमवून बेकायदेशिर जमाव जमवून सार्वजनीक रोडच्या मध्यभागी बसुन जिल्हाधिकारी बीड यांच्या आदेशाचे उल्लघन केले ,विनापरवाना ,बेकायदेशिर रस्ता अडवल्या प्रकरणी गणेश गोसावी यांचे फिर्यादीवरून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्यात मनोज पाटील जरांगेसह ५९ आंदोलकांचा समावेश असल्याचे पोलीस सुत्राकडून सांगण्यात आले,पुढील तपास स.पो.नी.गणेश धोकरट यांचे मार्गदर्शनाखाली स.फौ.वसंत जायभाये करत आहेत .