आमदार नमिताताई मुंदडा यांनी सकल मुस्लिम समाजाच्या मागण्याबद्दल दाखवलेल्या सहानुभूतीने समाजाने आमदाराचे मानले आभार

सब टायटल: 
भाजपाचे युवा नेते अक्षय मुंदडा यांनी आश्वासनाची केली पूर्तता
Rajkiya

.

          अंबाजोगाई  (प्रतिनिधी)- 

       मराठा समाजासो मुस्लिम समाज अथवा कोणत्याही समाजाच्या सार्वजनिक मागण्या संदर्भात केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार नमिताताई मुंदडा तातडीने या मागण्याची दखल घेऊन लोकप्रतिनिधी म्हणून जी जबाबदारी पार पाडायची असते ती जबाबदारी प्रथम त्या पार पाडतात राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सकल मुस्लिम समाजाच्या मागण्या संदर्भात विचार करून शासन आदेश पारित करावा अशी विनंती करणारे लेखी पत्र केज विधानसभेच्या आमदार नमिता ताई मुंदडा यांनी पाठवून त्याची प्रत बेमुदत धरणे आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना आपल्या समर्थका करवी पाठवून दिल्याने सकल मुस्लिम समाजाने आमदार मुंदडा यांचे आभार मानले आहेत

                     अंबाजोगाईच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल मुस्लिम समाजाचे आरक्षण, संरक्षण, शिक्षण या तीन मुद्द्यावर गेली पंधरा दिवसापासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहेत महाराष्ट्रातून प्रथम अंबाजोगाईत ही धरणे आंदोलने सुरू झाले असून हे आंदोलन मुस्लिम समाजातील आम नागरिकांनी सुरू केल्याने शहरातील खास असणारे माजी नगरसेवक, माजी नगराध्यक्ष ,माजी उपनगराध्यक्ष तसेच इतर जेष्ठ मंडळींना या आंदोलनाचा हेवा वाटला की काय कोण जाणे मात्र सुरुवातीच्या आठ दहा दिवस प्रशासन तसेच खास लोकांनी या धरणे आंदोलनाकडे कानाडोळा केला मात्र सकल मुस्लिम समाजाने सुरू केलेल्या आंदोलनाला सर्वच राजकीय नेते लोकप्रतिनिधी तसेच सकल मराठा समाजाने व इतर संघटनांनी आपला पाठिंबा दिला काही दिवसापूर्वी धरणे आंदोलनाला युवा नेते अक्षय मुंदडा यांनी भेट देऊन धरणे आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला तसेच तुमच्या या मागणी संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या पर्यंत पोहोच करण्याचे आश्वासन दिले होते

                दरम्यानच्या काळात छत्रपती संभाजीनगर येथे एका कार्यक्रमानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आले होते आंदोलनातील प्रमुख कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेऊन निवेदन दिले शासनाने मागण्या संदर्भात गांभीर्याने विचार करावा अशी ही त्या निवेदनात विनंती केली असता उपमुख्यमंत्र्यांनी ही सकारात्मक प्रतिसाद देत शासन तुमच्या मागण्या संदर्भात अनुकूल असल्याचे संकेत दिले आंदोलनकर्त्यांनी गेली पंधरा दिवसापासून सुरू असलेल्या आंदोलनाकडे प्रशासनाने पाठ फिरवल्याची खंत व्यक्त करतात दुसऱ्या दिवशी आंबेजोगाईचे तहसीलदार विलास तरंगे अचानक धरणे आंदोलन स्थळी पोहोचले त्यांनी धरणे आंदोलन करणाऱ्या आंदोलकाशी चर्चा केली धरणे आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली उद्या सोमवारी प्रशासकीय पातळीवर अंबाजोगाईच्या प्रशासनाने आंदोलनासंदर्भात काय पत्रकार व्यवहार केला यासंदर्भात ते माहिती देणार असल्याचे समजते

               अक्षय मुंदडा यांनी आश्वासनाची केली पूर्तता

        भाजपाचे युवा नेते अक्षय मुंदडा यांनी काही दिवसापूर्वी धरणे आंदोलनाला भेट देऊन तुमच्या मागण्या मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यापर्यंत पोहोच करण्याची आंदोलकांना हमी दिली होती तिन्ही पत्रे आमदार मुंदडा यांच्या कार्यालयातून मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांना मेलद्वारे तसेच पोस्टाने पाठवल्यानंतर त्या पत्राची प्रत धरणे आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना देण्यासाठी अक्षय मुंदडा यांनी आपल्या कार्यकर्त्याची टीम आंदोलन स्थळी पाठवून पत्राची प्रत पोहोच केली यावेळी संजय गंभीरे, माजी नगराध्यक्ष महादू मस्के, माजी नगरसेवक ताहेर भा, खलील मौलाना, शेख सुजात भाई, सामाजिक कार्यकर्ते नूर पटेल, बबलू सिद्दिकी ,अखिल शेख यासह अनेक मुंदडा समर्थक सोबत होते सदरील निवेदनाची प्रत आंदोलन स्थळी ॲड इस्माईल गवळी ,प्रा रमीज सर, खालेद चाऊस, फहद फारुकी, मुजाहेद खतीब, शाकेर काजी, आमेर खतीब, शेख इजहार ,मोहम्मद फैजान, फिरोज शेख, दानिश शेख सह अनेक आंदोलन करणारे सर्व प्रमुख कार्यकर्त्यांसह नागरिक उपस्थित होते