नगरपरिषदेला खरेच अनधिकृत नळ कनेक्शन बंद करायचे असतील तर सुरुवात धन दांडग्या पासून करा

सब टायटल: 
मेन लाईनवरील अनाधिकृत नळ कनेक्शन बंद करण्याची जनतेतून मागणी
Sampadkiya

.

                   अंबाजोगाई( प्रतिनिधी)-

          नगर परिषदेचे प्रशासक तथा सीओ डॉ उत्कर्ष गुट्टे यांची काही दिवसा पूर्वी अचानक बदली झाली होती यामुळे नगरपरिषदेच्या स्थानिक राजकारणातील एक गट नाराज तर दुसरा गट खुश झाला होता मात्र या गटाचा आनंद फार काळ टिकला नाही सीओ डॉ गुट्टे यांची बदली रद्द झाली नाराज गट खुश झाला तर खुश झालेल्या गटाच्या आनंदावर विर्जन पडले त्यामुळे त्या गटावर हात चोळत बसण्याची वेळ आली गेली पंधरा-वीस वर्षांत अनेक सीओ आले गेले मात्र कोणीही शहरातील अनाधिकृत नळ कनेक्शन बंद करण्याची भूमिका घेतली नाही सीओ डॉ गुट्टे यांनी अनाधिकृत नळ कनेक्शन बंद करण्याचा निर्णय घेतला सुरुवात भिमाई नगर पासून केली असली तरी अगोदर धन दांडग्याची नळ कनेक्शन बंद करा विशेष म्हणजे मेन लाईनवरील नळ कनेक्शन बंद करण्याची मागणी जनतेतून होत आहे

               अंबाजोगाई शहराला पाणीपुरवठा धनेगाव धरणातून होतो काही महिन्यापूर्वी पाटबंधारे खात्याने पाण्याची थकबाकी थकवणाऱ्या लातूर शहराचा पाणीपुरवठा बंद केला होता थकबाकी असणाऱ्या शहरात  दुसरा क्रमांक अंबाजोगाई शहराचा आहे पाच कोटी रुपये पेक्षा जास्त थकबाकी असल्याचे समजते मार्च एन्डला वसुलीच्या माध्यमातून अंबाजोगाई शहराचा पाणीपुरवठा कधीही खंडित होऊ शकतो ही शक्यता गृहीत धरून अंबाजोगाई नगरपरिषदेचे सीओनी अनाधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू केल्याचे दिसते त्याची सुरुवात भिमाई नगर पासून केली आहे अंबा कारखाना ते भगवान बाबा चौक येथे शहराला पिण्याचे पाणीपुरवठा करणारे जलकुंभ आहे त्यामुळे या मार्गावर मेन लाईन आहे सिओ डॉ उत्कर्ष गुट्टेनी मेन लाईनवरील नळ कनेक्शन कोणाचे किती इंची दिले ते पाणीपट्टी किती भरतात याचा आढावा घेतला तर अनाधिकृत नळ कनेक्शन धारक कोण आहेत हे लक्षात येईल मेन लाईन वरून एवढे नळ कनेक्शन असतील तर गावातील अनाधिकृत नळ कनेक्शनचे जाळे किती पसरले ते यावरून लक्षात येईल

                  संत भगवान बाबा चौकापासून शहरात अनेक ठिकाणी दोन चार मजली इमारती आहेत हॉटेल असो की लॉज ,खाजगी पाण्याची विक्री करणारे प्लॅन्ट यांना नेमके नळ कनेक्शन कोणत्या लाईनवर आहे त्याचीही तपासणी होणे आवश्यक आहे अंबाजोगाई शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाची असताना शहराच्या हद्दी बाहेर कॉलनीला पाणीपुरवठा करण्याचे प्रयोजन काय ? आज विषय आहे अनाधिकृत नळ कनेक्शनची सुरुवात केली तर किमान मेन लाईन वरील तरी अनाधिकृत नळ कनेक्शन बंद व्हावेत बंद केले नाही तरी आज पावेतो मुबलक पाणीपुरवठा होऊन पाणीपट्टी न भरणाऱ्या नळ धारकाकडून आज पावेतो  पाणीपट्टी वसुली झाली तर तेवढाच नगरपरिषद प्रशासनाची मार्चला वसुली होईल बघू नगरपरिषद प्रशासन काय भूमिका घेते ते !