ममदापूर फाट्यावर एसटी बस थांबवण्यासाठी रस्ता अडवला

.
अंबाजोगाई (प्रतिनिधी)-
एस.टी. बस मध्ये साठ वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना शासनाने प्रवास मोफत केला असला तरी एस.टी. बस थांब्यावर जेष्ठ नागरिक दिसताच बसचा चालक गाडी थांबवत नाही चालकाने थांबवली तरी वाहक डबल बेल वाजवून गाडी पुढे घ्यायला सांगतात अशीच घटना येल्डा पासून जवळच असणाऱ्या ममदापूर फाट्यावर घडली एस.टी. बस थांबवण्यासाठी रस्ता अडवला बस थांबली नाही मात्र रस्ता अडवण्यासाठी दगड उचलून टाकताना त्या वृद्धाचा मात्र जीव गेल्याची घटना घडल्याने येल्डा परिसरात संतापाची लाट पसरली आहे
दि 17 फेब्रुवारी रोजी ममदापूर पाटीवरून अंबाजोगाईला येण्यासाठी बजरंग लक्ष्मण चामनर वय 65 वर्ष थांबले असता अंबाजोगाई ते राक्षसवाडी या बसला हात केला मात्र बस थांबली नाही फाट्यावर थांबवत नसल्याने चामनर येल्डा बस स्टँडवर येऊन थांबले तरी बस चालकाने बस थांबवलीच नाही याचा राग मनात आला असावा बजरंग चामनर यांनी बस चालकाला जाब विचारण्यासाठी ममदापूर फाट्यावर जाऊन एस टी बस थांबण्यासाठी रस्ता अडवण्यासाठी रस्त्यावर दगड टाकली वय झाले असतानाही बस चालकाने बस थांबवले नाही बस थांबवण्यासाठी रस्त्यावर दगड टाकत असतानाच बजरंग चामनर अचानक बेशुद्ध होऊन त्याच ठिकाणी पडले त्यानंतर बस आली रस्त्यावरचे दगडे काढली बस निघून गेली मात्र बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या बजरंग चामनर याकडे कोणीही पाहिले नाही
घटनेची माहिती येल्डा गावातील गावकऱ्यांना समजताच गावकरी तातडीने जमा झाले पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी पंचनामा केला बजरंग चामनर चा मृत्यू कशामुळे झाला याचा अहवाल आल्यानंतर कार्यवाही केली जाईल असे आश्वासन पोलिसांनी गावकऱ्यांना दिल्याने गावकऱ्यांनी अंत्यविधी केल्याचे समजते अंबाजोगाई ते येल्डा असो की अंबाजोगाई ते राक्षस वाडी या बसवर गेल्या अनेक वर्षापासून डेपो मॅनेजर एकाच बस चालकांना कशासाठी ड्युटी देतात यापूर्वी गावकऱ्यांनी अशा बस चालकाविरुद्ध अनेक तक्रारी करून सुद्धा डेपो मॅनेजर नी दखल का घेतली नाही यासंदर्भात चौकशी व्हावी अशी येल्डा गावकऱ्यांनी मागणी केली आहे बघूया एसटी महामंडळाचे जिल्हा विभाग प्रमुख काय भूमिका घेतात ते !