माजी आमदार साठेंच्या शिष्टमंडळाला डीन यांनी मामा का बनवले

सब टायटल: 
सिटीस्कॅन मशीन दुरुस्तीसाठी जिल्हाधिकारी यांनी 90 लाख रुपयांचा निधी मंजूर केला
Arogya Shikshan

.

                      अंबाजोगाई (प्रतिनिधी)- 

अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयातील विविध समस्या सोडवण्यात याव्यात म्हणून माजी आमदार पृथ्वीराज साठे, अमर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली रुग्णालयाचे डीन यांना शिष्टमंडळ भेटून निवेदन दिले अँजोग्राफी व एन्जोप्लास्टी मशीन दोन वर्षापासून धूळ खात पडून आहे या प्रश्नावर डीन यांनी यासाठी लागणारा निधी उपलब्ध होताच ती सेवा तातडीने सुरू केली जाईल असे सांगण्यात आले मात्र हे काम अर्धवट पूर्ण झाल्याची माहिती समोर आली मग माजी आमदार साठे यांच्या शिष्टमंडळाला डीन यांनी मामा का बनवले ?असा प्रश्न निर्माण होतो

         माजी आमदार साठे, अमर देशमुख यांच्या नेतृत्वात डीन यांना शिष्टमंडळ भेटले तेव्हा माजी आमदारांनी सिटीस्कॅन मशीन चार महिन्यापासून बंद आहे कधी सुरू होणार? यावर डीन यांनी सिटीस्कॅन मशीन दुरुस्तीसाठी बीडच्या जिल्हाधिकारी यांनी तब्बल 90 लाख रुपयाचा निधी डीन ऑफिसच्या खात्यावर वर्ग केलाय लवकरच ती मशीन दुरुस्त होऊन सिटीस्कॅन मशीन सुरू होईल असे आश्र्वस्त केले माजी आमदार साठे यांनी दुसरा प्रश्न अत्यंत गंभीर मुद्द्याला हात घातला रुग्णालयाच्या इमारतीत गेली दोन वर्षापासून एन्जोप्लास्टी व अंज्योग्राफी करण्यासाठी मशीन धुळखात पडून आहेत सुरू का होत नाहीत यावर डीन म्हणाले त्यासाठी स्वतंत्र पावर लाईन ओढावी लागते त्यासाठी जवळपास 36 लाख रुपयांचा निधी लागणार आहे निधी उपलब्ध होताच त्या आरोग्य सुविधा रुग्णांना मिळतील मात्र या संदर्भात वेगळीच माहिती समोर आली आहे ती म्हणजे पावर लाईनचे काम करण्यासाठी नवीन ट्रांसफार्मर बसवण्यात आला असून ट्रान्सफॉर्मर पासून मशीनला कनेक्शन देण्यासाठी केबलची ऑर्डर विद्युत विभागाने दिली असून केबल उपलब्ध होताच विद्युत पुरवठा सुरू होईल ही माहिती डीन यांना कोणीही का दिली नाही असे कसे शक्य आहे मग माहिती असूनही डीन यांनी माजी आमदार साठेंच्या शिष्टमंडळाला मामा का बनवले ? अशीही चर्चा होत आहे इतर मागण्यांमध्ये प्रस्तुती विभागांमध्ये गरज असताना बालरोग तज्ञ थांबत नाहीत ,ओपीडीत विभाग प्रमुख असणारे डॉक्टर बसत नाहीत कुठल्याही शस्त्रक्रिया वेळेवर होत नाहीत डायलिसिस मशीन चार आहेत एकही मशीन सुरू नाही त्या सुरू कराव्यात कागदावर असणारे सर्व डॉक्टर प्रत्यक्षात रुग्णालयात हजर राहावेत अशा विविध मागण्याचा निवेदनात समावेश करण्यात आला होता