डॉ सुधीर देशमुख पगार अंबाजोगाईचा घेणार काम मात्र लातूर, सोलापूर आता नांदेडला करणार चालते का ?

.
अंबाजोगाई (प्रतिनिधी)-
अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व महाविद्यालयातील काही मूठभर डॉक्टर स्वतःला आमदार, खासदार समजतात की काय ? असा सर्वसामान्य जनतेला प्रश्न पडत आहे कार्यरत आहेत तेही डॉक्टर ओपीडी, वार्डात रुग्ण तपासत नाहीत सर्जरी विभागाचे विभाग प्रमुख डॉ सुधीर देशमुख यांनी अंबाजोगाईच्या डीनचा पदभार घेतल्यापासून डीन पदाशिवाय ते इतर कोणतेही कामच करू शकत नाहीत असे झाले आहे डॉ देशमुख पगार अंबाजोगाईच्या रुग्णालयातून घेणार काम मात्र लातूर ,सोलापूर आता नांदेडच्या रुग्णालयात करणार अंबाजोगाई करांना हे चालते का ? गेली चार महिन्यापासून अंबाजोगाईच्या रुग्णालयातील सिटीस्कॅन मशीन बंद आहे त्या संदर्भात एकाही राजकीय सत्ताधारी असो अथवा विरोधी पक्षाच्या नेता कार्यकर्त्यांनी कोणीही तोंड उघडायला तयार नाही ही सत्य परिस्थिती कोणालाही नाकारता येणार नाही
अंबाजोगाईच्या डीन पदाची तर पतच राहिली नाही अशीही चर्चा जनतेत होत आहे डॉ सुधीर देशमुख यांची मूळ पदस्थापना अंबाजोगाईच्या रुग्णालयात सर्जरी विभागाचे प्राध्यापक म्हणून आहे त्यांनी अंबाजोगाईचे प्रभारी डीन म्हणून गेली अनेक वर्ष काम केले त्यानंतर अंबाजोगाईच्या रुग्णालयाचा डीन पदाचा अतिरिक्त पदभार डॉ शिवाजी सुक्रे यांच्याकडे आल्यानंतर डॉ देशमुख यांची लातूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रभारी डीन म्हणून नियुक्ती झाली काही वर्ष त्या रुग्णालयात काम केल्यानंतर त्यांची सोलापूरच्या प्रभारी डीन पदी प्रतिनियुक्ती झाली तिथेही काही वर्ष काम केले आता पुन्हा त्यांची नांदेडला शासकीय रुग्णालयाच्या प्रभारी डीन म्हणून प्रतिनियुक्ती झाल्याचे आदेश निघाले आहेत त्यांना उद्या मुंबईच्या संचालक पदाचा पदभार मिळाला तरी अंबाजोगाईकरांना त्याचा आनंदच आहे मात्र सर्जरी विभागाला त्यांची मूळ पदस्थापना असताना त्यांची रुग्णसेवा अंबाजोगाईच्या रुग्णालयातील गोरगरीब रुग्णांना मिळत नाही त्याचे काय ?यासंदर्भात कोणीही तोंडातून ब्र शब्द काढायला तयार नाही हे विशेष !
अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयातील कोणकोणत्या सेवा भविष्यात बंद पडतात अशीच भीती रुग्णाच्या मनात निर्माण झाली आहे रुग्णालयातील सिटीस्कॅन मशिन चार महिने झाले बंद आहे कोणालाही याच्याशी देणे घेणे नाही तुमचे काहीच नुकसान होत नाही सर्वसामान्य रुग्णांना रुग्णसेवा मिळत नाही त्याच्याशी तुमचे काहीच देणे घेणे नाही का ? नसेल तर नका दावा करू सर्वसामान्य जनतेला तुम्हाला काही अडचण आली तर फोन करा डॉक्टरांना फोन करून तुमच्या सर्व टेस्ट करून उपचार होतील सिटीस्कॅन सारखी सुविधा गोरगरीब रुग्णांना मिळत नाही सत्ताधारी विरोधी पक्षाचा एकही नेता कार्यकर्ता बोलत नाही हे मौन कोणासाठी ?अशीही चर्चा सर्वसामान्य जनतेतून होत आहे