संकल्प विद्या प्रतिष्ठानचे "सुवर्णरत्न" पुरस्कार- २०२४ जाहीर

अंबाजोगाई (प्रतिनिधी)- येथील संकल्प विद्या प्रतिष्ठान च्या वतीने दरवर्षी दिल्या जाणा-या "सुवर्णरत्न" पुरस्काराचे वितरण यावर्षी मंगळवार,दि.२५ फेब्रुवारी २०२४ रोजी वितरित होणार आहे.यावर्षी हे पुरस्कार कल्पना देशपांडे (कला) अभिजीत जगताप (पत्रकारिता) मुख्तार शेख (सामाजिक), सुकुमार देशमुख (शैक्षणिक) यांना जाहिर झाले आहेत.तरी या पुरस्कार वितरण सोहळ्यास व सांस्कृतिक कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे कार्यवाहक प्रा.कैलास भागवत चोले यांनी केले आहे. पुरस्कार समितीचे प्रमुख दगडू लोमटे यांनी या पुरस्काराच्या शिफारशी केल्या आहेत. येथील संकल्प विद्या प्रतिष्ठानच्या वतीने विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षीच "सुवर्णरत्न" पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येते. यावर्षी २५ फेब्रुवारी मंगळवार २०२४ रोजी या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. सोबतच संकल्प विद्या मंदिर शाळेचा सांस्कृतिक कार्यक्रम ही आयोजित करण्यात आलेला आहे.या कार्यक्रमाला मुख्य आकर्षण तथा शुभ हस्ते पुरस्कार वितरणा साठी श्री ओमप्रकाशजी शेटे (प्रमुख आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समिती महाराष्ट्र शासन ) उदघाटक म्हणून ॲड शोभाताई लोमटे(ज्येष्ठ विधी तज्ञ तथा समाजसेविका) तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजय गंभीरे(नगरसेवक न.प.अंबाजोगाई) तर प्रमुख अतिथी म्हणून मुमताज पठाण (ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी प.स.अंबाजोगाई), रामेश्वरजी मुंडे (महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी) श्री.विशालजी जाजू ( बांधकाम सभापती योगेश्वरी औद्योगिक वसाहत) दगडू लोमटे (प्रमुख, सुवर्णरत्न पुरस्कार वितरण समिती) हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कल्पना देशपांडे, अभिजीत जगताप, मुख्तार शेख व सुकुमार देशमुख या मान्यवरांना त्यांनी त्यांच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल सुवर्णरत्न पुरस्कार-२०२४ देवून सन्मानित करण्यात येणार आहे.दिनांक २५ फेब्रुवारी २०२४ मंगळवार रोजी सकाळी ११. ३० वाजता मुकूंदराज सांस्कृतिक सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी या पुरस्कार वितरण सोहळ्यास व सांस्कृतिक कार्यक्रमास उपस्थित रहावे असे अवाहन संकल्प विद्या प्रतिष्ठानच्या सचिव प्रा.कैलास भागवत चोले, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती बडे रेखा सुभाष सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीमती कुलकर्णी मॅडम ,श्रीमती हनुमते मॅडम व संकल्प परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.