अंबाजोगाई शरद पवार यांची होणार जाहीर सभा

.
अंबाजोगाई (प्रतिनिधी)-
बीड जिल्हा शरद पवार यांच्या विचाराला मानणारा जिल्हा असल्याने गेली अनेक वर्षापासून या जिल्ह्यातून शरद पवार यांनी दिलेल्या उमेदवारांना जिल्ह्यातील जनता भरघोस मताने निवडून देते मात्र अलीकडे राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ची मान्यता व चिन्ह पवार यांच्याकडून काढून घेतल्यानंतर आता पहिल्यांदाच शरद पवार यांची आंबेजोगाईत जाहीर सभा होणार असल्याने या सभेत पवार काय बोलणार याकडे जिल्ह्याचे नव्हे मराठवाड्याचे लक्षण लागून राहील एवढे मात्र नक्की
धारूर येथील प्राध्यापक ईश्वर मुंडे हे सेवानिवृत्त कर्मचारी अधिकारी सेलचे राज्याचे प्रमुख म्हणून काम करतात आंबेजोगाईत या सेलचे मराठवाडा विभागीय स्तरावरील अधिवेशन येत्या फेब्रुवारीच्या शेवटच्या किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात घेण्याचा त्यांनी संकल्प केला आहे या अधिवेशनाला पवार साहेबांनी मार्गदर्शन करावे यासाठी निमंत्रण देण्यासाठी ते शरद पवार यांना भेटले त्यानंतर या अधिवेशनाला येणार असल्याची संमती पवार यांनी दिल्यानंतर आंबेजोगाई शरद पवार यांची सभा होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष आमदार संदीप क्षीरसागर व प्राध्यापक ईश्वर मुंडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले
बीड जिल्ह्यात सध्या राजकीय अस्थिरता आहे अनेक राजकीय नेते अस्वस्थ असल्याने बीड जिल्ह्यात राजकीय भूकंप होतो का ?याकडे राजकीय निरीक्षकांचे बारकाईने लक्ष असले तरी अद्याप ती बाब गोपनीय ठेवण्यात आल्याचे समजते राजकारणात मराठवाड्यातील विशेष म्हणजे बीड जिल्ह्यातील नेत्यांना फार मोठी ताकद शरद पवार यांनी दिली ती सर्व नेते पवार यांना सोडून गेली असली तरी आ संदीप क्षीरसागर,माजी आ साठे,सारखे निष्ठावंत सोबत आहेत शरद पवार राजकारणात कधी कोणता डाव खेळतील आज पावेतो कोणालाच अंदाज आलेला नाही बीड जिल्ह्यात शरद पवार कोणता राजकीय भूकंप घडवतात हे येणारा काळच सांगेल अशी चर्चा होत आहे