परळी शहरातिल रसवंतीगृहात मुलीचे फोटो काढल्याने राडा

सब टायटल: 
मालकासह कामगारास संतप्त नागरीकांनी दिला चोप
Crime

.

                         परळी(प्रतिनिधी)            

         शहरातील बाळकृष्ण रोडे चौकात असलेल्या लोकमान्य रसवंती गृहातील कामगाराने रस पिण्यासाठी आलेल्या मुलीचे फोटो काढल्याचे कळताच नागरीकांनी रसवंतीमधील त्या कामगारास चोप देत रसवंतीमध्ये चांगलाच राडा केला. पोलिसांनी हस्तक्षेप करत जमाव पांगवला असुन याबाबत रात्रीपर्यंत संभाजीनगर पोलिस ठाण्यात नोंद झालेली नव्हती.
               परळी शहरातील आर्य समाज परिसरातील बाळकृष्ण रोडे चौकात असलेल्या लोकमान्य रसवंती गृहात नेहमीच आक्षेपार्ह व्यक्ती असतात यातच शुक्रवार दि. 9 फेब्रुवारी रोजी रात्री आठ सात वाजता दोन मुली रस पिण्यासाठी आल्यानंतर तेथील कामगार मोबाईलमध्ये फोटो काढत असल्याचे त्या मुलींच्या लक्षात येताच त्यांनी ही बाब काही तरुणांना सांगितली.
              यानंतर मोठा जमाव रसवंतीसमोर जमल्यानंतर त्या कामगाराचा मोबाईल तपासत चोप दिला. यामध्ये रसवंती चालक येताच त्यालाही चोप दिला. जमाव जमल्यानंतर संभाजीनगर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेनंतर रात्री नऊ वाजेपर्यंत राणी लक्ष्मीबाई टॉवर परिसरात तणाव होता. याबाबत रात्री उशीरापर्यंत संभाजीनगर पोलिस ठाण्यात कसलीही नोंद झालेली नव्हती