नंदकिशोर मुंदडा यांचा उस्ताद अमजद अली खान यांच्याशी थेट संवाद

सब टायटल: 
अक्षरशः अंगावर शहारे आणणारा आनंदाचा क्षण...
Desh-Videsh

.

                    अंबाजोगाई (प्रतिनिधी )-  

    मराठवाड्याचे भूमिपुत्र महान तपस्वी गायक पद्मविभूषण पंडित सी आर व्यास यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त अंबाजोगाई येथे भव्य दिव्य गुनिजाण संगीत समारोह संपन्न झाला या समारोहातील अखेरच्या सत्रामध्ये विश्वविख्यात सरोद वादक पद्मविभूषण उस्ताद अमजद अली खान साहेब यांचे दोन्ही सुपुत्र अमान अली व आयान अली बंगश यांचे बहारदार सरोद वादन संपन्न झाले. कार्यक्रमानंतर या जगविख्यात कलावंतासाठी नंदकिशोर मुंदडा यांनी स्नेहभोजन कार्यक्रम आयोजित केलेला होता. नंदकिशोर मुंदडा यांच्या आदरातिथ्यामुळे सर्वच कलावंत अक्षरशः भारावून गेलेले होते. पंचतारांकित संस्कृतीमध्ये सदैव वावरणाऱ्या या कलावंतांना हा अनुभव अत्यंत वेगळा होता. स्वतः नंदकिशोर मुंदडा यांनी आपल्या हाताने अमान अली आणि आयान अली यांना दाल बाटी कुस्करून खाऊ घातली. त्यामुळे
उस्ताद अमान अली यांनी नंदकिशोर मुंदडा यांच्या आदरातिथ्यामुळे प्रभावित होऊन स्वतः जगविख्यात सरोद वादक आणि पिताश्री उस्ताद अमजद अली खान साहेब यांना व्हिडिओ कॉल केला आणि काकाजींच्या आदरातिथ्याबद्दल माहिती दिली.. उस्ताद अमजद अली खान साहेब यांनी लागलीच काकाजींशी संवाद साधला आणि भरभरून आशीर्वादही दिले... याप्रसंगी काकाजींनी उस्तादजींच्या तब्येतीची विचारपूस करून उत्तम आरोग्यासाठी मनोकामना व्यक्त केली. दिल्लीला आल्यानंतर आठवणीने आपण घरी भेट द्यावी असे निमंत्रण ही स्वतः उस्तादजींनी नंदकिशोर मुंदडा यांना अत्यंत प्रेमाने दिले. हा ऐतिहासिक क्षण सर्वजण जवळ उभे राहून अनुभवत होते.. अंबाजोगाईच्या सांस्कृतिक परंपरेला अतिउच्च पातळीवर घेऊन जाणारा हा प्रसंग नंदकिशोर मुंदडा यांच्यासाठी अविस्मरणीय आहेच परंतु एक अंबाजोगाईकर म्हणून प्रत्येकालाच अभिमान वाटण्यासारखा तो क्षण आहे.