राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी उमेश पोखरकर तर केजच्या तालुकाध्यक्षपदी विष्णू चाटे यांच्या निवडी पालकमंत्र्याच्या हस्ते

Rajkiya

.

                     अंबाजोगाई (प्रतिनिधी)-

                       बीड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक केव्हाही होऊ शकते भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट )शिवसेना (शिंदे गट)च्या वतीने विद्यमान खासदार डॉ प्रीतम ताई मुंडे यांना सर्वात जास्त मताने याही निवडणुकीत निवडून आणण्याचा संकल्प तीन पक्षाच्या बैठकीत पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जाहीर केल्यानंतर जिल्ह्यात पालकमंत्री सक्रिय झाल्याचे दिसले त्यानंतर विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट)च्या जिल्हा उपाध्यक्षपदी टायगर ग्रुप चे उमेश पोखरकर यांची पालकमंत्र्यांच्या हस्ते निवड जाहीर केली त्या अगोदर केजच्या तालुकाध्यक्षपदी विष्णू चाटे यांची निवड जाहीर केली होती या दोन घटनेमुळे पक्ष, संघटना मजबूत करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे सरसावल्याचे चित्र दिसत आहे

                  बीड जिल्ह्यातील राजकारणाचा विचार केला तर प्रत्येक विधानसभा मतदारसंघात  पक्षीय पातळीवरील राजकारणापेक्षा व्यक्तिविशेष राजकारणाला बीड जिल्ह्यात महत्त्व दिले जाते त्यामुळे विधानसभेचा आमदार असो नाही तर जिल्ह्याचा खासदार तोच पक्ष असे मानले जाते त्यामुळे बीड जिल्ह्यातील कोणत्याच राजकीय पक्षाचा जिल्हा अध्यक्ष आपल्या पक्षाची शाखा जिल्ह्यात कुठेही स्थापन करत नाही अथवा नवीन कार्यकर्त्यांना पक्षासोबत जोडत नाही त्यामुळे राजकीय पक्षात फक्त नेते शिल्लक राहिले आहेत गुत्तेदारांनी कार्यकर्त्याची जागा काबीज केली आहे प्रत्येक पक्षात पक्षाच्या विचाराला मानणारा कार्यकर्ता ऐवजी नेत्याची मर्जी सांभाळणारे गुत्तेदाराची फौज निर्माण झाली आहे नेत्याने पक्ष बदलला की गुत्तेदार कार्यकर्त्यांना कशाचाही विधी निषेध नसतो नेतृत्वाच्या पाठीशी जय म्हणत त्या पक्षात जातात

       अंबाजोगाई मध्ये भाजपात अनेक कार्यकर्त्यांचा प्रवेश झाला मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट)चे नेते हाताची घडी तोंडावर बोट ठेवून फक्त मुक दर्शक बनुन या सर्व घटनाकडे पाहत बसले होते पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी याबाबतीत पुढाकार घ्यावा लागला अगोदर केजच्या तालुकाध्यक्षपदी विष्णू चाटे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गटाच्या) तालुकाध्यक्षपदी निवडीची घोषणा केली त्यानंतर अंबाजोगाईत गेल्या अनेक वर्षांपासून तरुणाचा एक मोठ्या गटाचा कार्यकर्ता टायगर ग्रुपचे प्रमुख तसेच अलीकडे गोशाळा चालवणारे उमेश पोखरकर यांना पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते बीड जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्तीचे पत्र देण्यात आले या दोन निवडीने पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी विकास कामासोबतच बीड जिल्ह्यात पक्ष संघटना वाढवण्याकडे जातीने लक्ष देत असल्याचे समोर आले आहे बीड जिल्ह्यात पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत होता आता दोन भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर पक्षाचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पक्ष नेतृत्व असल्याचे सिद्ध करण्यासाठी पालकमंत्र्यांनी पुढाकार घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटाला) अच्छे दिन येण्याची शक्यता वर्तवली जात आहे