बीडचे सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी बर्दापूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील त्या घटनेची केली चौकशी

सब टायटल: 
तालुका आरोग्य अधिकाऱ्यानी गैरहजर दहा कर्मचाऱ्यांना दिली कारणे दाखवा नोटीस
Arogya Shikshan

.

अंबाजोगाई (प्रतिनिधी)-

               दि 3 फेब्रुवारी रोजी अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील एका गरोदर महिला प्रसूतीसाठी आरोग्य केंद्रात आली मात्र एकही आरोग्य कर्मचारी आरोग्य केंद्रात नसल्याने ती दारात वाट पाहत बसली त्यादरम्यान त्या महिलेची प्रसूती झाली घटनेची बातमी मराठवाडा दर्पण न्युज मध्ये आल्यानंतर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली बीडचे सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ रौफ यांनी बर्दापूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचाऱ्यांचे जबाब आज नोंदवून घेतले तर अंबाजोगाईच्या तालुका आरोग्य अधिकारी यांनी आरोग्य केंद्रातील तब्बल दहा कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे कार्यवाही काय होते याकडे जनतेचे लक्ष लागून राहिले आहे

         अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर प्राथमिक आरोग्य केंद्र सर्वात जुने असून बर्दापूर गावासह इतर खेडेगावातील रुग्ण या आरोग्य केंद्रात उपचारासाठी येतात आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी तसेच इतर कर्मचारी वेळेवर येत नाहीत आले तरी रुग्ण सेवा रुग्णांना देत नाहीत अशा गावकऱ्यांनी अनेक वेळा अंबाजोगाईचे तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे तक्रारी केल्या मात्र तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी बर्दापूर सह इतर प्राथमिक आरोग्य केंद्राला साध्या भेटी देऊन नागरिकांच्या तक्रारीचे निरसन करायला हवे होते मात्र ते आरोग्य अधिकाऱ्यांनी केल्याचे दिसत नाही दिनांक 3 फेब्रुवारी रोजी घटना घडल्यानंतर तालुका आरोग्य अधिकारी खडबडून जागे झाले तातडीने त्यांनी बर्दापूर आरोग्य केंद्राला भेट देऊन घटने दिवशी गैरहजर राहणाऱ्या दहा आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना नोटीस हा देऊन खुलासा मागवून आपल्या चुकीवर पडदा टाकण्याचे काम केल्याची चर्चा नागरिकांतून होत आहे

              एका गरोदर महिलेला प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर तासभरापासून थांबून एकही आरोग्य कर्मचारी आला नाही त्या महिलेची दारात प्रसूती होते या घटनेची बातमी वाऱ्यासारखी जिल्हाभरात पसरली आरोग्य खात्यातील निष्काळजीपणाचा हा कळसच होता तातडीने बीडचे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना घटनेच्या चौकशीसाठी बर्दापूर येथे पाठवले डॉ रौफ यांच्यासोबत आज अंबाजोगाईचे तालुका आरोग्य अधिकारीही होते बर्दापूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी बर्दापूरला राहत नाहीत त्यांचा कर्मचाऱ्यावर वचक नाही रुग्णाची तपासणी तसेच रुग्णालयाची स्वच्छता केली जात नाही त्या दिवशीच्या घटनेने तर कहरच केला अशा तक्रारी गावातील नागरिकासह बर्दापूर गावच्या सरपंच पती विकास मोरे यांनी सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे केल्या आहेत यावेळी डॉ रौफ म्हणाले सर्व आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्याचे  जबाब घेतलीत चौकशी अहवाल जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना सादर केला जाईल त्यानंतर जे दोषी कर्मचारी असतील वरिष्ठ नक्की यावर कार्यवाही करतील असेही आश्र्वस्त गावकऱ्यांना डॉ रौफ यांनी केले

तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी ज्यांना घटनेच्या दिवशी गैरहजर होते आशा कर्मचारी व अधिकाऱ्यांना नोटीस दिल्यात त्यामध्ये डॉ हाडबे डॉ अंजान आरोग्य अधिकारी श्री तपसे श्रीमती कराड सहाय्यक वैरागे कुलकर्णी टेक्निशियन जगताप औषध निर्माता श्रीमती साखरे स्टाफ नर्स शिंदे व कांबळे शिपाई आदी कर्मचारी व अधिकाऱ्यांचा समावेश आहे आता जिल्हा आरोग्य अधिकारी काय कार्यवाही करतात याकडे बर्दापूर वासियांचे लक्ष लागून राहिले आहे