अंबाजोगाई नगर परिषदेचे प्रशासक तथा सीओ डॉ उत्कर्ष गुट्टे यांचा स्थानिक राजकारणात राजकीय बळी ?

.
अंबाजोगाई (प्रतिनिधी)-
अंबाजोगाई नगर परिषदेचे प्रशासक तथा सीओ डॉ उत्कर्ष गुट्टे यांना येऊन सहा महिने झाले नाहीत तेच त्यांची बदली करण्यात आली याउलट अंबाजोगाई येथे गेली अनेक वर्ष एकाच ठिकाणी एकाच कार्यालयात ठाण मांडून बसलेले प्रशासकीय अधिकारी असूनही त्यांची आजही बदली झाली नाही त्यामुळे डॉ उत्कर्ष गुट्टे यांचा स्थानिक राजकारणाच्या हेव्या दाव्यात राजकीय बळी दिला काय ? अशीही चर्चा होत आहे
डॉ उत्कर्ष गुट्टे अंबाजोगाई नगर परिषदेत रुजू झाल्यानंतर त्यांनी अनेक नगरपरिषदेच्या प्रशासनात धाडसी निर्णय घेतले जे यापूर्वीच्या सीओनी कोणीही घेऊ शकले नाहीत त्यात अनेक जनहिताचे निर्णय असले तरी काही निर्णयामुळे स्थानिक नेत्याचा इगो हार्ट झाल्याची चर्चा त्यावेळी झाली होती त्या मुद्द्यावर शिष्टमंडळाने सीओ यांची भेट घेतल्यानंतर काही मुद्द्यावर बैठकीत वाद झाला असल्याचे समजते प्रयत्न करूनही गुट्टे आपल्याला मदत करत नाहीत त्यामुळे लोकसभा निवडणुकीची पार्श्वभूमी असताना आगामी विधानसभेच्या निवडणुकीत परळी विधानसभा मतदारसंघात अंबाजोगाई नगर परिषदेचे सीओ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी असतात म्हणून सीओ डॉ उत्कर्ष गुट्टे यांची बदली केल्याचे सांगण्यात येत असले तरी अजून विधानसभा निवडणुकीला बराच कालावधी शिल्लक असूनही लोकसभा निवडणूक झालेली नसताना विधानसभा निवडणुकीचा संदर्भ अंबाजोगाईचे सीओ डॉ उत्कर्ष गुट्टे यांच्या बदलीला दिला जात असल्याने शंका कुशंका व्यक्त केल्या जात आहेत
डॉक्टर उत्कर्ष गुट्टे आणखीन जास्त का राहिले तर एका गटाला नगरपरिषदेवर आपले वर्चस्व दाखवण्यासाठी संधी मिळेल तर दुसरीकडे गेली 25 वर्षाच्या परंपरेला आपल्या वर्चस्वाला छेद बसेल या भीतीने नगरपरिषदेचे प्रशासक तथा शिव डॉक्टर उत्कर्ष गुट्टे यांची बदली झाल्याची शहरात चर्चा होत आहे बदली संदर्भात थेट सीओ डॉक्टर उत्कर्ष गुट्टे यांना विचारले असता आपण काही दिवसाच्या सुट्टीवर होतो आज येत आहोत बदलीचे आदेश अद्याप पर्यंत पाहिले नाहीत एवढ्या कमी कालावधीत बदली झाली याबद्दल मत विचारले असता आदेश काय आहेत पाहिल्यानंतर आपल्याशी नक्की बोलेन असेही गुड्डी म्हणाले वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सीओ डॉक्टर उत्कर्ष गुट्टे यांची झालेली बदली रद्द करावी अशी मागणी करण्यात आली आहे राज्यात भाजप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट शिवसेना शिंदे गट हे तिन्ही पक्ष एकत्र असले तरी आंबेजोगाईच्या स्थानिक पातळीवरील राजकारणात भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट चे नेते सतत आमने-सामने राजकारणात असतात त्यामुळे स्थानिक च्या राजकारणात आंबेजोगाई नगर परिषदेचे प्रशासक तथा सीओ डॉक्टर उत्कर्ष गुट्टे यांचा राजकीय बळी गेला का अशीही चर्चा शहरात होत आहे