ट्रक- दुचाकीचा अपघात; माय लेकराचा जागीच मृत्यू

सब टायटल: 
माऊली फाट्या जवळ घडली घटना
Crime

.

                     माजलगाव (प्रतिनिधी )- 

         माजलगाव ते गढी रोडवर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅकचा व दुचाकीचा अपघात झाला. यामधे दुचाकी वरील माय लेकराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दि.४ रविवार संध्याकाळी ८ वाजण्याच्या दरम्यान माऊली फाट्या जवळ घडली.

              या विषयी मिळालेली माहिती अशी की,दि.४ रात्री ८  वाजण्याच्या दरम्यान माजलगाव – गढी रोडवर माऊली फाटा (हारकी लीमगाव) येथे ऊस वाहतूक करणारा ट्रक व दुचाकीचा अपघात झाला. यामधे दुचाकीवरील भागवत उर्फ पप्पु सुभाष इंगळे (वय २२ वर्षे) व मालन सुभाष इंगळे (वय ४७ वर्षे) रा.राजेगाव या माय लेकराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह माजलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.या घटनेमुळे राजेगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.