लोकनेते सुनील काका लोमटे यांचे सामाजिक कार्य पुढे चालू ठेवणार !

.
अंबाजोगई (प्रतिनिधी)-
लोकनेते सुनील काका लोमटे यांनी आपल्या हयातीत सामाजिक कामाला प्राधान्य दिले अनेकांच्या मदतीला धावले त्यामुळे त्यांचे अधूरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाज कार्य करत करत राजकारण करणार असल्याचे मनोगत ॲड शोभाताई लोमटे यांनी शहरातील पत्रकाराशी वार्तालाप करताना व्यक्त केले
ॲड शोभाताई लोमटे यांनी यापूर्वी अंबाजोगाई नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाची सार्वत्रिक निवडणूक लढवली होती त्यावेळी अवघ्या काही मताने त्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पराभूत झाल्या स्वीकृत सदस्यासाठी त्यांचे नाव चर्चेत असताना भाजपातील अंतर्गत गटबाजीमुळे त्यांची संधी हुकली होती पराभूत होऊन सुद्धा समाजकार्य त्यांचे सुरूच होते अचानक सुनील काका लोमटेनी जगाचा निरोप घेतला अंबाजोगाई शहरातील सर्व समाजांच्या चाहत्यांची त्यांची किती नाळ जुळलेली होती हे अंत्यविधीच्या वेळी अनेकांनी डोळ्यांनी पाहून आश्चर्य व्यक्त केले होते आता सुनील काका लोमटे नंतर कुटुंबाची भूमिका काय ? अशी शहरात चर्चा होती मात्र आज स्वतः ॲड शोभाताई लोमटे यांनी माध्यमाच्या प्रतिनिधीशी संवाद साधून लोकनेते सुनील काका लोमटे यांनी सुरू केलेला सामाजिक कामाचा यज्ञ तर सुरूच राहील त्यांचे अनेक अधुरे स्वप्न आहेत ते पूर्ण करण्याचा निर्धार त्यांनी केला असल्याचेही ॲड लोमटे म्हणाल्या पत्रकारांचा प्रश्न होता तुम्ही नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवली होती त्यावेळी सुनील काका लोमटे हयात होते आता सध्याच्या परिस्थितीत तुमची राजकीय भूमिका काय असेल ?
ॲड शोभाताई लोमटे म्हणाल्या आपण स्वतः स्व यशवंतराव चव्हाण साहेबांचे विचाराने प्रेरित आहोत तसेच लोकनेते सुनील काकांचे कार्य आपण अनेक वर्ष जवळून पाहिले समाजकारण करत करत त्याला राजकारणाची जोड असल्याशिवाय समाजकारण अपुरे राहते त्यामुळे लोकनेते सुनील काका लोमटे सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय राहणार असल्याच्या प्रतिक्रिया पत्रकारांशी बोलताना त्यांनी व्यक्त केले यावेळी त्यांचे सुपुत्र कृष्णा लोमटे यांचीही उपस्थिती होती ॲड शोभाताई लोमटे यांनी राजकारणात सक्रिय राहणार असल्याचे जाहीर केल्यामुळे भविष्यात शहरातील राजकारणात काय घडामोडी घडतात याकडे राजकीय समीक्षकांचे लक्ष लागून आहे