बर्दापूर आरोग्य केंद्र समोर गरोदर महिला तासभर थांबली दारातच झाली डिलिव्हरी



.
अंबाजोगाई (प्रतिनिधी)-
केंद्र व राज्य सरकारचा आरोग्य विभाग कितीही दावा करत असला तरी अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर आरोग्य केंद्रात एकही आरोग्य कर्मचारी केंद्रात हजर नसल्याने बर्दापूर पासून जवळच असलेल्या लिंबगाव गावातील गरोदर महिला प्रसूतीसाठी आरोग्य केंद्रात आली आरोग्य केंद्र समोर एक तास थांबूनही आरोग्य केंद्रात एकही आरोग्य कर्मचारी हजर नसल्याने ती महिला आलेल्या खाजगी टाटा सुमो वाहनातच डिलिव्हरी झाली या घटनेमुळे महिलेचे नातेवाईक व इतर नागरिक संतप्त झाले वरिष्ठ अधिकारी यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन आरोग्य केंद्रात पोहोचले महिलेला रुग्णालयात घेऊन उपचार सुरू केले गैरहजर कर्मचाऱ्यांना नोटीस देऊन योग्य ती कार्यवाही करू असे आरोग्य अधिकाऱ्यांनी नातेवाईकांना आश्वासन दिले आहे
अंबाजोगाई तालुक्यात बर्दापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर स्टाफ नर्स आरोग्य कर्मचारी असूनही कोणाचा कोणावरही वचक नसल्याने आवो जाओ घर तुम्हारा पद्धतीने आरोग्य केंद्राचा कारभार चालतो यापूर्वी बर्दापूर येथील नागरिकांनी गैरहजर आरोग्य कर्मचारी व डॉक्टर बद्दल अनेक वेळा तक्रारी केल्या मात्र तालुका आरोग्य अधिकारी यांनी म्हणावी तशी या तक्रारीची दखल न घेतल्याने आरोग्य कर्मचारी व डॉक्टर वर फारसा फरक पडला नव्हता अशीच अवस्था तालुक्यातील इतर आरोग्य केंद्राची ही झाली असल्याचा नागरिक आरोप करत आहेत
आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास बर्दापूर पासून जवळच असणाऱ्या लिंबगाव गावची महिला प्रसूतीसाठी खाजगी वाहन करून बर्दापूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्र समोर येऊन थांबली महिलेच्या नातेवाईकांनी रुग्णालयात जाऊन चौकशी केली तर केंद्रात कोणीही आरोग्य कर्मचारी नसल्याने ती महिला तब्बल एक तास त्या आलेल्या वाहनातच वाट पाहत आरोग्य केंद्राच्या दारात बसली अखेर एक तासानंतर आरोग्य केंद्राच्या दारातच वाहनांमध्ये त्या महिलेची डिलेव्हरी (बाळंत) झाल्यानंतर ही खेदजनक घटनेची माहिती महिलेच्या नातेवाईकांनी स्थानिक प्रमुख कार्यकर्त्यांना कल्पना देताच आरोग्य केंद्र समोर जमाव जमला काहींनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ बाळासाहेब लोमटे यांना फोन करून घटनेची कल्पना दिली
डॉ बाळासाहेब लोमटे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रभारी डॉक्टरांची कान उघडनीं करताच डॉक्टर आरोग्य कर्मचारी बर्दापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाले दारात डिलिव्हरी झालेल्या महिलेला केंद्रात दाखल करून घेऊन उपचार सुरू केले तालुका आरोग्य अधिकारी डॉ लोमटे यांनी सदर गंभीर घटनेची दखल घेत अगोदर त्या महिलेवर योग्य ते उपचार करा अशा सूचना देत आजची घटना गंभीर अत्यंत दुर्दैवी असून जे कर्मचारी गैरहजर होते कर्तव्यात कसूर करणाऱ्यांना नोटीसा देऊन खुलासा घेऊन त्यानंतर योग्य ती कार्यवाही केली जाईल असे ठोस आश्वासन नातेवाईकांना दिल्यामुळे संतप्त झालेला जमाव शांत झाला अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रकार समोर आला असला तरी इतरही प्राथमिक आरोग्य केंद्रावर यापेक्षा वेगळी परिस्थिती नसल्याच्या प्रतिक्रिया सर्वसामान्य जनतेतून व्यक्त केल्या जात आहेत तालुका आरोग्य अधिकारी डॉ लोमटे या घटनेची किती दखल घेतात हे पाहावे लागेल