अंबाजोगाईचे उपजिल्हाधिकारी झाडके व प्रशासक तथा सीओ डॉ उत्कृष्ट गुट्टे यांची बदली

.
अंबाजोगाई (प्रतिनिधी)-
उपजिल्हाधिकारी शरद झाडके यांनी परळी, केज ,अंबाजोगाई या तीन तालुक्यात तहसीलदार व उपजिल्हाधिकारी पदावर बराच कालावधी घालवला मात्र सर्वांसोबत सुरक्षित अंतर कायम ठेवले तसेच या कार्यकाळात कोणताही जनता अथवा लोकप्रतिनिधीच्या वतीने आरोप प्रत्यारोप न झाल्याने यशस्वी अधिकारी म्हणून त्यांची प्रशासकीय कार्यकाळा मधली नक्की नोंद होईल त्यांची बदली लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे झाली आहे
महसूल खात्याची प्रतिमा ज्या अधिकाऱ्यामुळे मलीन झाली त्या उपजिल्हाधिकारी बाफना (माजलगाव) सागरे(बीड) या दोन्हीही उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या शासनाने केल्या आहेत बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी प्रशासकीय कामात बरीच पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला महसूल खात्यातीलच अधिकारी भ्रष्टाचाराला कसे खतपाणी घालतात मागील दोन घटना घडल्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या लक्षात आले उपजिल्हाधिकारी शरद झाडके यांनी तीन तालुक्यात एवढी वर्ष काढताना अनेक वेळा त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्नही झाला मात्र कायम कायद्याच्या चौकटीत राहून प्रशासन चालवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे कुठलाही आरोप त्यांच्यावर होऊ शकला नाही गेली काही महिन्यापासून त्यांच्याकडे उपजिल्हाधिकारी सह अप्पर जिल्हाधिकारी अतिरिक्त पदभार होता मात्र पारदर्शक कामामुळे उपजिल्हाधिकारी झाडके सुरक्षित राहिले अशीही चर्चा जनतेतून ऐकवास मिळत आहे
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहा महिन्यापूर्वी आलेले अंबाजोगाई नगर परिषदेचे प्रशासक तथा सीओ डॉ उत्कर्ष गुट्टे आले होते बऱ्यापैकी नगरपरिषद प्रशासनाची घडी बसवत असतानाच अचानक त्यांचे गाव परळी विधानसभा मतदारसंघात असल्याने त्यांची बदली धाराशिव येथे झाली आहे
बदल्या झाल्या येणार कोण ?
अंबाजोगाईचे अप्पर जिल्हाधिकारी यादव यांची बदली झाल्यानंतर आज पावेतो कोणीही अधिकारी रुजू झाला नाही उपजिल्हाधिकारी शरद झाडके यांची निलंगा येथे बदली झाली त्यांच्या जागी कोण येणार माहित नाही नगर परिषदेचे प्रशासक तथा सीओ डॉ उत्कर्ष गुट्टे यांची धाराशिव येथे बदली झाली त्यांच्या जागी कोण येणार माहित नाही स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय अंबाजोगाईचे अधिष्ठाता डॉ भास्कर खैरे महिन्याभरात सेवानिवृत्त होत आहेत त्यानंतर रुग्णालयाचा डीन कोण ? अशीही चर्चा जनतेतून ऐकवास मिळत आहे एक काळ असाही होता अंबाजोगाईला नियुक्ती मिळावी यासाठी प्रशासकीय अधिकारी विशेष प्रयत्न करत असत मात्र एवढी पदे रिक्त होऊनही कोणीही अंबाजोगाईला येण्यासाठी उत्सुक का नाही? डीन पदासाठी पात्र आहेत ते म्हणतात प्रभारी डीन नको कायमस्वरूपी पदभार द्या बदल्या आदेश निघाले आता येत्या एक-दोन दिवसात नियुक्तीचे आदेश निघणार आहेत त्यात अंबाजोगाईला कोणाची कोणत्या पदावर नियुक्ती होते हे लवकरच समजेल