आमदार सुरेश धस यांनी निवडून गेल्यानंतर मतदार संघात डूकुनही पाहिले नाही

.
अंबाजोगाई (प्रतिनिधी)-
बीड ,लातूर ,धाराशिव या तीन जिल्ह्यातील नगर परिषदेचे अध्यक्ष, नगरसेवक ,जिल्हा परिषद ,पंचायत समितीचे सभापती, सदस्य या मतदारांनी निवडून दिलेले आमदार सुरेश आण्णा धस यांचा आज वाढदिवस आहे अण्णा तुम्ही निवडून गेल्यानंतर मतदार जिवंत आहेत का ? एवढे तरी पाहण्यासाठी यायला हवे होते निवडून गेल्यानंतर मतदार संघात तुम्ही डूकूनही पाहिले नाही अशी खंत आमदार सुरेश आण्णा धस यांच्या मतदारांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त व्यक्त केली आहे
आमदार सुरेश अण्णा धस यांचा मतदार तीन जिल्ह्यात विखुरला गेलेला आहे इतर दोन जिल्ह्याचे सोडा किमान बीड जिल्ह्यात तरी विविध नगरपरिषदे अंतर्गत काय समस्या आहेत याचा आज पावेतो आमदार सुरेश आण्णा धस यांनी साधा आढावा घ्यावा त्यांना असे का वाटले नाही तीन जिल्ह्यातील मतदारांनी दिलेली आमदारकी व मिळत असलेला फंड फक्त आष्टी मतदार संघापुरताच मिळाला आहे का ? तुमचा फंड आजपर्यंत नेमक्या कोणत्या नगर परिषदेच्या शहरासाठी वापरला गेला ते तरी अण्णा सांगा अशी ही मागणी मतदार आमदार सुरेश आण्णा धस यांना करत आहेत आमदार सुरेश आण्णा धस यांचा वाढदिवस आज आहे त्यानिमित्ताने तीन जिल्ह्याच्या माहितीसाठी का होईना एकदा तुमचा वापरला गेलेला फंड कुठे वापरला ते जाहीर करा अशीही मागणी सुरेश आण्णा धस यांना मतदार करत आहेत आता आमदार काय भूमिका घेतात ते पाहावे लागेल