अंबाजोगाईचे मंडळ अधिकारी गोविंद जाधव यांना जिल्हाधिकारी यांनी केले निलंबीत

सब टायटल: 
स्वतःनी रद्द केलेले फेरफार अधिकार नसताना केले मंजूर
Crime

.

                     अंबाजोगाई (प्रतिनिधी)-

   अंबाजोगाईचे मंडळ अधिकारी गोविंद हरिभाऊ जाधव यांनी गेले दोन वर्षात एक हजाराच्या जवळपास फेरफार नामंजूर केले अधिकार नसताना स्वतःंनी रद्द केलेले फेर पुन्हा मंजूर केल्याचे पडताळणीमध्ये उघडकीस आल्याने बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी अंबाजोगाईचे मंडळ अधिकारी यांना निलंबित केल्याचे आदेश पारीत केले आहेत

 अंबाजोगाईचे उपजिल्हाधिकारी यांनी अंबाजोगाईच्या तहसीलदार यांच्याकडून मंडळ अधिकारी जाधव यांनी माहे जानेवारी 2021 ते ऑक्टोबर 2023 या दोन वर्षाच्या कालावधीत नामंजूर फेरफारची माहिती मागवली असता मंडळ अधिकाऱ्यांनी तब्बल 953 नोंदी नामंजूर केल्याचे उपजिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आले नामंजूर केलेल्या नोंदीची फेर तपासणी केल्या असता बऱ्याच नोंदी असंयुक्तिक कारण देऊन ना मंजूर केल्याची बाब निदर्शनास आली आहे नामंजूर नोंदी पुन्हा अधिकार नसताना मंजूर केल्याचे दिसून येते फेर नामंजूर करताना तलाठी यांनी फेरफार संचिका सादर न केल्याने सदर नोंद नामंजूर असे वारंवार तेच ते शेरे मारले असल्याचेही समजते विशेष म्हणजे तांत्रिक अडचणी बाबत मंडळ अधिकारी यांनी एन आयसी ला न कळवता अधिकार नसताना तेच फेर पुन्हा मंजूर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे मंडळ अधिकारी यांनी फेर नामंजूर केल्यानंतर त्यावर निर्णय घेण्याचा अधिकार उपजिल्हाधिकाऱ्यांना असतो अधिकाराचे उल्लंघन झाल्याचेही आदेशात म्हटले आहे वरील सर्व बाबींचा अहवाल अंबाजोगाईचे उपजिल्हाधिकारी यांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या  अहवालात बाबी नमूद केल्या आहेत

            उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालानंतर जिल्हाधिकारी बीड यांनी मंडळ अधिकारी गोविंद जाधव यांना दिनांक 9 जानेवारी 2024 रोजी एक लेखी नोटीस देऊन खुलासा मागवला खुलाशावर उपजिल्हाधिकाऱ्यांचा अभिप्राय मागवला असता त्यांनी केलेल्या शिफारशीवरून बीडच्या जिल्हाधिकारी यांनी अंबाजोगाईचे मंडळ अधिकारी गोविंद जाधव यांना तात्काळ निलंबित करण्यात आल्याचे आदेश पारित केले असून निलंबन काळात केज तहसील कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत विशेष म्हणजे आज मंडळ अधिकारी जाधव यांना मंडळ अधिकारी कार्यालयात बसले असल्याचे दिसले त्यांना त्यांच्यावर केलेल्या निलंबनाच्या कारवाईची चौकशी केली असता ते म्हणाले मला अजून आदेश मिळाले नाहीत जोपर्यंत मला आदेश मिळत नाही तोपर्यंत मी कार्यरत आहे असेही ते म्हणाले