माजलगाव तालुक्यात वाळू माफियानी केला कहर.

सब टायटल: 
अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने मोटारसायकलवरील दोन व्यक्तीना चिरडले दोन्हीही व्यक्ती जागीच ठार.
Crime

.

                   माजलगाव ( प्रतिनिधी )-

  माजलगाव तालुक्यात वाळू माफियांनी वाळु चोरीचा कहर मांडला आहे.तालुक्यातील सादोळा गावानजीक असलेल्या सांगवी पुलाजवळ वाळूच्या भरलेल्या ट्रॅक्टरने मोटरसायकलला जोराची धडक देऊन त्यावरील दोन व्यक्तींना चिरडले.या अपघातात मोटरसायकल वरील दोन्ही व्यक्ती जागीच ठार झाल्या आहेत.ही घटना ३० जानेवारी मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली.
  
         अपघातात मयत झालेले विजय युवराज पगारे वय ३७ वर्ष व महेश रावसाहेब ढोकचवळे वय ३३ वर्षे दोन्ही राहणार रांजणखोल ता राहाता जिल्हा नगर येथील रहिवासी आहेत.मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ते मोटार सायकल(क्र.होंडा एम एच-१७ सि.डब्ल्यू.३२०९)वरून माजलगाव तालुक्यातील सादोळा गावा जवळील सांगवी पुलावरून आष्टी शहराकडे जात होते.यावेळी सादोळा गंगा पात्रातून अवैद्य वाळू उपसा करणाऱ्या ट्रॅकटरने मोटार सायकलला जोराची धडक दिली.या आपघातात दोन्ही मोटारसायकल स्वार जागीच ठार झाले.दरम्यान पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी हलवण्यात आले आहेत.अपघातातील दोन्ही वाहने ताब्यात घेतले आहेत.अवैध वाळू उपसा करणारे ट्रॅकर सादोळा येथील   असल्याची माहिती आहे.दरम्यान ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास एपीआय झोनवाळ करत आहेत
 
     दरम्यान अपघात झाल्यानंतर ट्रॅक्टर चालक हा ट्रॅक्टर घेऊन पळून जात असताना काही अंतरावरच ट्रॅक्टर पलटी झाल्याने पोलिसांना ते ट्रॅक्टर सापडले व ताब्यात घेतले त्यातील वाळू त्या ठिकाणी पडून आहे